Kerosene Saam Tv
देश विदेश

Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Kerosene Distribution on Petrol Pump: इराण-इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पेट्रोल पंपावरुन रॉकेलचे वितरण होणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Siddhi Hande

रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

आता पेट्रोल पंपावरही मिळणार रॉकेल

पेट्रोल पंपावरुन रॉकेल वितरणास परवानगी

इराण-इस्त्रायल युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. युद्धामुळे देशात कच्चे तेल आणि एलपीजी गॅस पुरवठा कमी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने रॉकेलबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला पेट्रोल पंपावरही रॉकेल म्हणजेच केरोसीन मिळणार आहे.

रॉकेलबाबत सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. याआधी रेशन दुकानांवर रॉकेल मिळायचे. आता पेट्रोल पंपावरदेखील रॉकेल दिले जाणार आहे. इंडियन ऑइल (IPOCL), भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावरुन रॉकेल खरेदी करु शकतात.

रॉकेलबाबत महत्त्वाचा निर्णय

सध्या एलपीजी गॅससाठी नागरिकांनी एजन्सीबाहेर रांगा लावल्या आहेत. अनेकांना एलपीजीसाठी खूप दिवस वाट पाहावी लागते. त्यामुळेच जर एलपीजी गॅस नसेल तर तुम्ही स्टोव्हवर स्वयंपाक करु शकतात. यासाठी तुम्हाला रॉकेल दिले जाणार आहेत. इराण-इस्त्रायल युद्धामुळे एलपीजी आणि कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या परिस्थितीत रॉकेल लवकरात लवकर घरापर्यंत पोहचावे, यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलियम सुरक्षा आणि परवाना नियमांमध्ये शिथिलता आणली आहे.

नवीन नियमांनुसार, विविध राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे.ज्या राज्यांमध्य आधी पीडीएस म्हणजेच सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे रॉकेल दिले जात नव्हते तिथे ही सुविधा सुरु केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा निर्णय लागू झाला आहे. या राज्यांमध्ये केरोसीन वितरण तातडीने करणे शक्य आहे.

पेट्रोल पंपावर मिळणार रॉकेल

२१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात २ पेट्रोल पंपावर रॉकेल वितरणाची सोय असणार आहे. पेट्रोल पंपावर जास्तीत जास्त ५००० लिटरपर्यंत केरोसीन ठेवता येईल.यानंतर थेट पेट्रोल पंपांवरुन नागरिकांना केरोसीन वितरित करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT