Shreya Maskar
उन्हाळ्यात काकडी शरीराला हायड्रेटेड आणि आतून थंड ठेवण्यास मदत करते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. भर उन्हाळ्यात काकडी तांबुली हा थंड पदार्थ बनवा.
काकडी तांबुली (Cucumber Tambuli) हा दक्षिण भारतातील (कर्नाटक/कोकण) एक पारंपारिक गोड पदार्थ आहे. तुम्ही जेवणासोबत याचा आस्वाद घेऊ शकता.
काकडी तांबुली बनवण्यासाठी काकड्या, नारळ, आल्याचे तुकडे, काळी मिरी, पुदिन्याची पाने, जिरे, दही , चवीनुसार काळे मीठ, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्ता इत्यादी साहित्य लागते.
काकडी तांबुली बनवण्यासाठी सर्वप्रथम काकड्या स्वच्छ सोलून त्याची साले काढून लहान तुकडे करा.
ओला नारळ लहान तुकड्यांमध्ये कापून घाला. नारळाचे तुकडे आणि काकडीचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या.
यात पुदिन्याची पाने, जिरे, चवीनुसार मीठ, थोडे काळे मीठ, काळी मिरी आणि आल्याचा तुकडा टाकून वाटून घ्या. यात थोडे पाणी टाका.
एका बाऊलमध्ये सर्व मिश्रण काढून त्यात दही मिक्स करा. ही रेसिपी रायत्या सारखी दिसते.
तडका बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुक्या लाल मिरच्या, मोहरी, कढीपत्ता घाला. शेवटी तयार तडका काकडीवर टाका.