Shreya Maskar
कोकणात बनवतात तशी कैरीची कढी घरी बनवा. उन्हाळ्यात भरपूर कैरी येतात, ज्याचे विविध पदार्थ बनवले जातात. जे खायला खूपच चटकदार असतात.
कैरीची कढी बनवण्यासाठी कैरी, ओला नारळ, गूळ, मीठ, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, तेल, मोहरी, मेथी दाणे, सुकी लाल मिरची, हिंग, कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
कैरीची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून वाफेवर चांगली उकडून घ्या. यामुळे कैरीची चव आणखी वाढते.
मिक्सरमध्ये किसलेला ओला नारळ, कैरीचा गर टाकून जाडसर पेस्ट बनवा. वाटणामध्ये ग्लासभर पाणी घाला. जेणेकरून पेस्ट छान होईल.
तयार मिश्रण एका बाऊलमध्ये गाळून त्यात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर मिश्रणात गूळ घाला.
कढीला फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी दाणे आणि सुकी लाल मिरची घालून छान तडतडू द्या. त्यानंतर मिश्रणात हिंग आणि नारळाचे दूध टाका.
शेवटी कढीवर हिरवीगार कोथिंबीर घालून गरमागरम भातासोबत कैरीच्या कढीचा आस्वाद घ्या.
कच्ची कैरी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते, पचनशक्ती सुधारते आणि व्हिटॅमिन 'C' मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून कच्ची कैरी खा.