Khichadi Recipe : डाळ खिचडी तर नेहमी खाता, एकदा ट्राय करा 'हा' खिचडीचा प्रकार; पोटही भरेल अन् पोषणही मिळेल

Shreya Maskar

खिचडी

खिचडी ही बनवायला सोपी आणि खायला रूचकर असते. यामुळे आपले पोट देखील भरलेले राहते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून गव्हाची खिचडी एकदा ट्राय करा.

Khichadi | yandex

गव्हाची खिचडी

गव्हाची खिचडी बनवण्यासाठी गहू, मुगाची डाळ, हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, जिरे, मीठ, हळद, हिंग, तूप आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.

Khichadi | yandex

गहू

गव्हाची खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम गहू ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही सकाळी गहू भिजत ठेवून दुपारी खिचडी बनवू शकता.

Wheat | yandex

मुगाची डाळ

मुगाची डाळ १-२ तास पाण्यात भिजत टाका. त्यानंतर कुकरमध्ये गहू आणि मुगाची डाळ चांगली शिजवून घ्या. ३ शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजेल. मऊ होते.

Moong Dal | yandex

हळद

गहू आणि डाळ दुप्पट पाणी टाकून शिजवून घ्या. यात हळद आणि चवीनुसार मीठ टाकायला विसरू नका. यामुळे पदार्थाला चांगली चव येते.

Turmeric | yandex

लाल मिरची

छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, लाल मिरची, हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता टाकून फोडणी करून घ्या. फोडणीसाठी गॅस कमी आचेवर ठेवून द्या.

Red Chilies | yandex

कोथिंबीर

तयार खिचडीवर गरमागरम फोडणी द्या आणि वरून हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा. १०-१५ मिनिटांत चमचमीत आणि हेल्दी गव्हाची खिचडी तयार झाली.

Coriander | yandex

पापड-रायता

कुरकुरीत पापड आणि आंबट-गोड रायत्यासोबत गव्हाची खिचडीचा आस्वाद घ्या. तुम्ही गहू गरम पाण्यात देखील भिजवू शकता, जेणेकरून वेळ वाचेल.

Papad and Raita | yandex

NEXT : कोकणी मेजवानी! कोवळ्या फणसाची सुकी भाजी कधी खाल्लीय का? एकदा चव चाखाल तर खातच राहाल

Fansachi Sukhi Rhaji Recipe | saam tv
येथे क्लिक करा...