Shreya Maskar
आता बाजारात कोवळा फणस आला आहे. गावाकडे बनवतात तशी कोवळ्या फणसाची सुकी भाजी एकदा घरी नक्की ट्राय करा. भाकरीसोबत भाजीची चव भारी लागेल.
कोवळ्या फणसाची सुकी भाजी बनवण्यासाठी कच्चा फणस, तेल, मीठ, मोहरी, लसूण, कढीपत्ता, कांदा, हिंग, हळद, मिरची पावडर, ओले हरभरे, शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
कोवळ्या फणसाची सुकी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम फणसाचे बारीक काप करा आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्या. यात तुम्ही पाणी आणि मीठ घाला.
फणस थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये फणस हाताने मॅश करून घ्या. जेणेकरून फणसाचा स्वाद छान येईल.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे , कढीपत्ता, हिंग आणि बारीक केलेला लसूण घालून खमंग परतून घ्या. गॅस कमी आचेवर ठेवा.
भाजीत बारीक चिरलेला कांदा , हळद, लाल तिखट, मसाले घालून परतून घ्या. आता यात चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाका.
त्यानंतर मिश्रणात मॅश केलेला फणस आणि शिजवलेले चणे घालून भाजी ५-६ मिनिटे चांगली शिजवून घ्या. शेवटी फणसाच्या भाजीवर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा.
कोवळ्या फणसाच्या भाजीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे भरपूर असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.