Shreya Maskar
कच्ची केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, त्यात फायबर, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर ठरते.
कच्च्या केळीची भाजी बनवण्यासाठी कच्ची केळी, कांदा, टोमॅटो, मीठ, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, शेंगदाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.
कच्च्या केळीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम केळी स्वच्छ धुवून घ्या. सोलून घ्यावी. त्यानंतर केळीची साल काढून त्याचे गोल पातळ काप करून घ्या.
केळीची साल चिकट असेल तर हाताला थोडे तेल लावून सोला. सोललेली केळी लगेच पाण्यात टाका, जेणेकरून ती काळी पडणार नाही.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे , हिरव्या मिरच्या आणि सुक्या लाल मिरच्या घालून परता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा.
आता यात आलं-लसणाची पेस्ट, टोमॅटो, हळद, धने-जिरे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून भाजी एकजीव करा.
मसाल्याला तेल सुटू लागले की, त्यात केळीचे काप आणि शेंगदाण्याचा कूट घाला. त्यानंतर भाजी चांगली शिजवून घ्या.
कच्च्या केळीच्या भाजीवर हिरवीगार कोथिंबीर टाकून गरमागरम भाकरीसोबत कच्च्या केळीच्या भाजीचा आस्वाद घ्या.