Acharya Shri Vidyasagar Maharaj Samadhi Saamtv
देश विदेश

Acharya Shri Vidyasagar Maharaj: जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांनी घेतली समाधी; जैन धर्मीयांवर शोककळा

Acharya Shri Vidyasagar Maharaj Samadhi: श्री. विद्यासागर महाराज यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जैन बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Gangappa Pujari

Acharya Shri Vidyasagar Maharaj:

जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत ऋषी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज रात्री 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. श्री. विद्यासागर महाराज यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने जैन बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आचार्य श्री विद्यासागर महाराज गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी अन्नपाणी सोडले होते. आचार्य शेवटच्या श्वासापर्यंत शुद्धीत राहिले आणि त्यांनी मंत्रोच्चार करत आपला प्राण सोडला. विद्यासागर महाराज यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांनाही आदरांजली वाहिली. "माझ्या प्रार्थना त्यांच्या असंख्य भक्तांसोबत आहेत, समाजातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक प्रबोधन, गरिबी निर्मूलन, आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर कामांसाठी त्यांनी केलेल्या अमूल्य योगदानासाठी येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. विद्यासागर जी महाराजांचा वर्षानुवर्षे आशीर्वाद मला मिळाला," असे पंतप्रधान म्हणाले.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आचार्यजींचा जन्म 10 ऑक्टोबर 1946 रोजी कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यातील सदलगा गावात झाला. त्यांनी 30 जून 1968 रोजी राजस्थानमधील अजमेर शहरात त्यांचे गुरु आचार्यश्री ज्ञानसागर जी महाराज यांच्याकडून मुनिदीक्षा घेतली. त्यांची कठोर तपश्चर्या पाहून आचार्यश्री ज्ञानसागरजी महाराजांनी त्यांच्यावर आचार्यपदाची जबाबदारी सोपवली होती.

आचार्यश्री 1975 च्या सुमारास बुंदेलखंडमध्ये आले. बुंदेलखंडच्या जैन समाजाच्या भक्ती आणि समर्पणाने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी आपला बहुतेक वेळ बुंदेलखंडमध्ये घालवला. आचार्यश्रींनी सुमारे 350 दीक्षा दिल्या आहेत. त्यांचे शिष्य जैन धर्माचा प्रसार करण्यासाठी देशभर फिरत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत मंगळवारी बदल

राज्यभरात सोमवारी जनआक्रोश आंदोलन, ठाकरे मैदानात उतरणार

Samruddhi Kelkar: परी म्हणू की सुंदरा! समृद्धीच्या घायाळ अदा पाहून व्हाल फिदा

WhatsApp Ticketing : खुशखबर! मुंबई लोकल ट्रेनचं तिकीट Whatsappवर, जाणून घ्या बुकींग स्टेप्स

Manoj Jarange Patil : फडणवीस मराठा नेत्यांना संपविण्याच्या तयारीत, भाजप आमदार- खासदारांचे फोन; मनोज जरांगे पाटील यांचा धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT