Maharashtra Live News Update: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज रविवार, दिनांक १० ऑगस्ट २०२५, शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महाराष्ट्रातील पाऊस अपडेट, पुणे रेव्ह पार्टी प्रकरण अपडेट, लाडकी बहीण योजना अपडेट, पंतप्रधान पीकविमा योजना अपडेट राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Beed: सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

बीड -

आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला जामीन मंजूर

सतीश भोसले याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणात त्याला अटक देखील करण्यात आली.

सध्या तो बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

Pune: बस बंद पडल्यास चालक आणि अभियंताचे अर्धा दिवसाचे वेतन कापणार

पुणे -

बस बंद पडल्यास चालक आणि अभियंताचे अर्धा दिवसाचे वेतन कापणार

पी एम पी व्यवस्थापनाचा निर्णय

कर्मचारी संघटनांचा मात्र निर्णयाला विरोध

पीएमपी बस रस्त्यात बंद पडल्या तर संबंधित बस चालक आणि देखभाल अभियंत्याच्या दिवसाचे अर्ध वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

Baramati: बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार

बारामती -

बारामतीत अजित पवारांचा जनता दरबार

बारामती शहरातील सहयोग सोसायटीमधील अजित पवारांच्या निवासस्थानी जनता दरबार

जनता दरबाराला बारामतीकरांनी केली मोठी गर्दी

अजित पवार आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर

Jalna: जालन्यात मिरची पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी संकटात

जालन्यात मिरची पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव

मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झा

जालन्यातील शेतकरी संकटात

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण , गाडेगव्हाण, सातेफळ आणि परिसरामध्ये मोठं नुकसान

Malegaon: मालेगाव शहरामध्ये बदलत्या वातावरणामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

मालेगाव शहरात बदलत्या वातावरणामुळे व्हायरल फिवर- डेंगीची साथ

नाशिकच्या मालेगावमध्ये बदलत्या वातावरणामुळे ताप, खोकला याच बरोबर डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत

विशेषत लहान मुलांची संख्या अधिक असून खासगी रुग्णालयमध्ये रुग्णांची संख्या अधिक

शहरात असलेली अस्वच्छता, दुषित पाणी, तुंबलेल्या गटारी यामुळे व्हायरल फीवरची साथ तसेच काही रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे खाजगी डॉक्टरांनी स्पष्ट केले

Nandurbar: दादागिरी करत महिलाची छेड काढणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

नंदुरबार -

दादागिरी करत महिलाची छेड काढणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड

कान आणि हात धरून शहादा पोलिसांनी काढली गावभर धिंड

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे जिल्हाभरात कौतुक

Dharashiv: येरमाळा येथील येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात

धाराशिव -

येरमाळा येथील येडेश्वरी देवीची नारळी पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात

नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त राज्यातून भाविक दर्शनासाठी येरमाळ्यात

येडेश्वरी देवीच्या पालखी आणि दहीहंडीसह निघालेल्या गाव प्रदक्षिणेत भाविकांनी येरमाळा येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक दहीहांडी फोडण्याचा कार्यक्रम यावेळी पार पडला.

श्री येडेश्वरी देवीच्या वर्षातून भरणाऱ्या दोन यात्रे पैकी नारळी पोर्णिमा ही दुसरी महत्त्वाची यात्रा समजली जाते.

त्यामुळे राज्यातून अनेक भाविक यात्रेला हजेरी लावतात.

Amravati: अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पात 54% जलसाठा

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील 56 पाणी प्रकल्पात 54% जलसाठा

मागील तीन दिवस अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अप्पर वर्धा धरणातील जलसाठा पोहचला 65 टक्क्यांवर

अनेक पाणी प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा

मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस झाल्यास अपर वर्धा धरण भरणार पूर्ण क्षमतेने.

Tulajapur: मधुकरराव चव्हाण यांच्याकडून तुळजापुरातील जलजीवनच्या कामाच्या चौकशीची मागणी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडून तुळजापूर तालुक्यातील जलजीवनच्या कामाच्या चौकशीची मागणी

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

योजना राबवणारे अधिकारी व गुत्तेदार लोकप्रतिनिधींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार करत असल्याचा चव्हाण यांचा आरोप

Nashik: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार, शिंदेंसेनेची उद्या नाशिकमध्ये बैठक

नाशिक -

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी शिंदेंच्या सेनेची उद्या नाशिकमध्ये बैठक

- बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत , माजी खासदार राहुल शेवाळे , पक्ष सचिव संजीव मोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती

- उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा या बैठकीत घेतला जाणार आहे आढावा

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

- स्वबळावर निवडणूक लढवणे , मतदार याद्या, मतदार नोंदणी , यावर चर्चा होण्याची शक्यता

Satara: प्रशासनाविरोधात 105 गावातील नागरिकांचा रास्ता रोको

सातारा-

प्रशासनाविरोधात 105 गावातील नागरिकांचा रास्ता रोको

कोयना भागातील 105 गाव समाज संघटनेच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनी रास्तारोको आंदोलन

तापोळा-वाघेरा येथे निकृष्ट दर्जाची विकासकामे, बीएसएनएलचा भोंगळ कारभार, विजेचा लपंडाव आणि इतर सामाजिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आणि जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

कांदाटी, सोळशी, कोयना खोऱ्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Baramati: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर

बारामती -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

अजित पवारांनी केली बारामती बस स्थानक परिसरात विकास कामांची पाहणी

अजित पवार यांनी बारामती बस स्थानक परिसरासह शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे.

सुरू असणारी सर्व कामे दर्जात्मक करण्याच्या सूचना यावेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Buldhana: सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी

बुलडाणा -

सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी

सतत चार दिवसांपासून सुरू आहे पाऊस

शेताला आले तलावाचे स्वरूप

Pune: पुण्यात नागपूरच्या स्मार्ट स्वच्छतागृहाचा पॅटर्न

पुणे -

पुण्यात नागपूरच्या स्मार्ट स्वच्छतागृहाचा पॅटर्न

नागपूर शहराच्या प्रवेशद्वारांवर अत्याधुनिक वातानुकूलित ‘व्हीआयपी’ स्मार्ट स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत

त्याच धर्तीवर पुणे महापालिका पाच ठिकाणी शहराच्या प्रवेशद्वारावर अशी स्वच्छतागृह उभारणार

Pandharpur - माढ्याचे तहसीलदार संजय भोसलेना वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

पंढरपूर -

माढ्याचे तहसीलदार संजय भोसलेना वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न

माढ्याच्या मुंगशी गावातील सीना नदीच्या पात्रातून जेसीबीद्वारे वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

कारवाईदरम्यान एक टिप्पर, दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह उत्खनन करुन वाहतूक करत असताना तहसीलदारांनी पथकाद्वारे पकडले

यावेळी तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Buldhana: सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी

बुलडाणा -

सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी

सतत चार दिवसांपासून सुरू आहे पाऊस

शेताला आले तलावाचे स्वरूप

Buldhana: वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडमध्ये, कारवाईचे दिले आदेश 

बुलडाणा -

वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडमध्ये

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आज वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश..

वाळू माफिया बंद न झाल्यास जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक जबाबदार ..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com