Alexei Navalny : नवाल्नी हत्या प्रकरणात फक्त पुतीन जबाबदार; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन संतापले

Joe Biden : रशियाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीनचे कट्टरविरोधी अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झालाय. यमालो- नेनट्स ऑटोनॉमस डिस्ट्रिट प्रशासनने अधिकृत विधानानुसार, आज नवाल्नी यांचा तुरुंगात मृत्यू झाला. याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. नवाल्नी यांच्या हत्येसाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन जबाबदार असल्याचं बायडन यांनी म्हटलंय.
Joe Biden
Joe BidenSaam Tv
Published On

Joe Biden Reaction On Alexei Navalny Death :

रशियाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतीनचे कट्टरविरोधी अलेक्सी नवाल्नी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. नवाल्नी यांच्या हत्येसाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन जबाबदार असल्याचं बायडन यांनी म्हटलंय. (Latest News)

2020 मध्येही खुनाचा प्रयत्न झाला होता

अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूसाठी पुतीन यांना जबाबदार धरून बायडन म्हणाले, ' २०२० मध्ये त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असता. त्यांची इच्छा असती, तर त्यानंतर ते निर्वासितपणे सुरक्षितपणे जगू शकले असते, कारण त्यावेळी ते त्यांच्या देशातही नव्हते. त्यांना तुरुंगात टाकले जाईल किंवा त्याची हत्या केली जाईल हे जाणूनही अलेक्सी नवाल्नी रशियाला परतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यांनी असं केलं कारण ते आपला देश रशियाशी प्रेम करत होते. जर नवाल्नी यांच्या मृत्यूची बातमी खरी असेल आणि माझ्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही, तर रशियन अधिकाऱ्यांनी कोणती खोटी कहाणी सांगू नये. नवाल्नीच्या मृत्यूला केवळ पुतीन जबाबदार आहेत, असं बायडन म्हणालेत.

यामालो-नेनेट्स स्वायत्त जिल्हा प्रशासनाने अधिकृत निवेदनात म्हटलंय की, शुक्रवारी तुरुंगात फिरल्यानंतर नवाल्नीची तब्येत बिघडली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले, मात्र ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com