Pune News : पुणे विद्यापीठ परिसरात आजपासून वाहतुकीत बदल, शिवजंयतीनिमित्तही अनेक मार्ग बंद; काय असतील पर्यायी मार्ग

Pune university Route Change : बाणेर आणि औंध रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी प्रवेश बंद घालण्यात आली आहे.
Pune News
Pune News Saam Tv
Published On

अक्षय बडवे | पुणे

Pune News :

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आजपासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौकात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शनिवारपासून प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी सेनापती बापट रस्ता आणि गणेशखिंड रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी दिलेला उजवे वळण (राइट टर्न) आणि यू टर्न बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून चतु:शृंगी पोलिस ठाण्यासमोरील मिलेनियम गेटमधून उजवीकडे वळून विद्यापीठात इच्छित स्थळी जाता येईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News
BJP Meeting : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान ठरणार?

बाणेर आणि औंध रस्त्याने येणाऱ्या वाहनांना पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठात जाण्यासाठी प्रवेश बंद घालण्यात आली आहे. औंध रस्त्याने येणाऱ्या वाहनांनी पुणे विद्यापीठात जाण्यासाठी मिलेनियम गेटमधून प्रवेश करावा, असे आवाहन वाहतूक विभागानं केलं आहे. (Latest News Update)

Pune News
Fireworks Seized : चीनमधून आणलेले ११ कोटींचे फटाके जप्त, न्हावा शिवा येथे कस्टम विभागाची कारवाई

शिवजंयतीनिमित्तही वाहतुकीत बदल

शिवजयंतीनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. शहरातील अनेक मुख्य रस्ते उद्या वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com