Kalyan Crime News: दर्शनाच्या बहाण्याने जैन मंदिरांमध्ये करायचा चोरी, डोबिंवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kalyan Crime News: पारंपरिक वेश परिधान करून जैन मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने मंदिरातील चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत आहेत.
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam Digital
Published On

अभिजित देशमुख

Kalyan Crime News

पारंपरिक वेश परिधान करून जैन मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने मंदिरातील चांदीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत आहेत. नरेश जैन असं चोरट्याचं नाव असून हा फक्त जैन मंदिरांमध्ये चोऱ्या करत होता. नरेश विरोधात मुंबईमधील विविध पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असून डोंबिवलीतील तीन जैन मंदिरात त्यांने चोरी केल्याचं समोर आलं आहे.

डोंबिवली परिसरातील तीन जैन मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली होती .चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे दागिने ,चांदीच्या वस्तू चोरी केल्या होत्या. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी सुनील कुराडे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आशालाता खापरे बळवंत भराडे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
INDIA Alliance: इंडिया आघाडीला आणखी एक धक्का! ममतांपाठोपाठ 'आप'नेही साथ सोडली? 'एकला चलो रे'चा नारा

दरम्यान मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळख पटवून पोलिसांनी नरेश जैन या सराईत चोरट्याला मुंबई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. नरेश हा जैन मंदिर मध्ये चोऱ्या करायचा .नरेश पारंपारिक वेशभूषा करत दर्शनाच्या पाहण्याने जैन मंदिरात जात होता संधी मिळताच जैन मंदिरातील दागिने चोरी करायचाॉ. नरेश विरोधात मुंबईमधील काळाचौकी, एलटी मार्क, सायन, आगरी पाडा , आझाद मैदान, मलबार हिल, घाटकोपर, डी एन नगर ,बोरवली पोलीस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत .

Kalyan Crime News
Wardha Crime News: लाच स्वीकारताना ग्रामसेवक महिलेला पकडलं रंगेहात; वर्धामधील संतापजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com