Bihar News Saam Tv
देश विदेश

Shocking: नवरा नपुंसक, शरीरसंबंध नाहीच, पण २० महिने जवळही आला नाही; बायकोनं पोलिसांना सांगितली लग्नानंतरची भलतीच गोष्ट

Bihar Crime: बिहारमध्ये एका महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत नवरा आणि सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. नवरा नपुंसक असून तो शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसंच हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.

Priya More

Summary -

  • बिहारमध्ये महिलेने नवऱ्यावर नपुंसक असल्याचा आरोप केला

  • सासरच्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले

  • हुंड्यासाठी कारची मागणी केल्याचा आरोप

  • पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला

बिहारमध्ये एका महिलेने नवरा नपुंसक असून सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढून टाकल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या नवऱ्यासह ५ जणांविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. महिलेने आरोप केला की, तिचा नवरा शरीरसंबंध ठेवण्यास असमर्थ आहे. असे असताना देखील तो तिच्याकडे माहेरून कार घेऊन ये अशी माागणी करत होता. मागणी पूर्ण न केल्यामुळे सासच्यांनी तिला मारहाण करत घराबाहेर काढले.

बिहारच्या गोला पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका गावामध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या बहिणीसह पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत महिलेच्या भावाने असे म्हटले आहे की, त्याने २५ एप्रिल २०२४ रोजी खजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणसोबत त्याच्या बहिणीचे लग्न लावून दिले होते. लग्नात लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. त्यांच्या ऐपतीनुसार हुंडा देण्यात आला होता. तरी देखील बहिणीच्या सासरची मंडळी समाधानी नव्हती.

आरोप असा करण्यात आला आहे की, बहिणीचा नवरा आणि सासरच्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी असल्याने कारची अतिरिक्त मागणी केली. लग्नानंतर बहिणीच्या नवऱ्याचे वर्तन बदलले. अनेकदा तो बहिणीसोबत न झोपता दुसऱ्या खोलीत किंवा बाहेर झोपायचा. ज्यामुळे त्याची बहीण मानसिक तणावात राहू लागली. त्यानंतर त्यांना माहिती पडले की बहिणीचा नवरा नपुंसक असून तो शरीरसंबंध बनवण्यासाठी असमर्थ आहे आणि त्याचे उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना देखील त्याच्यात सुधारणा नाही झाली.

कार द्यायला नकार दिल्यामुळे बहिणीच्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी २५ नोव्हेंबर २०२४ ला तिला शिवीगाळ केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचसोबत त्यांनी तिला मारहाण करत घरातून बाहेर काढले. त्यांनी तिचे सर्व दागिने आणि इतर सामान स्वत:कडे ठेवले. तेव्हापासून पीडित महिला तिच्या आई-वडीलांच्या घरी राहत आहे.महिलेच्या तक्रारीच्या आधारे, तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा, मारहाण आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शीचे आमदार दिलीप सोपाल अजित पवारांच्या भेटीला

Beet Carrot Juice Benefits: आठवड्यातून ३ दिवस बीट-गाजर ज्यूस प्यायल्याने शरिरात कोणते आरोग्यदायी फायदे होतात?

मुंबई महापालिका निवडणूक होताच एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; निकालानंतर 29 नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम, कारण काय?

Diet Pohe: वजन कमी करायचंय? मग डाएटमध्ये अशापद्धतीने खा पोहे खा, नोट करा रेसिपीच्या टिप्स

भाजपची ताकद वाढली; राऊतांचा शेकडो शिवसैनिकांसह प्रवेश, बदलापुरातील राजकीय समीकरण बदललं

SCROLL FOR NEXT