बिहारच्या विजयानंतर भाजप ऑन अ‍ॅक्शन मोड; माजी मंत्र्यांची पक्षातून हकालपट्टी, नेमकं कारण काय?

BJP Issues Notice Suspends Ex-Minister RK Singh: बिहार निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या यशानंतर आर के. सिंह यांना भाजपने तत्काळ निलंबित केलं. पक्षविरोधी कारवाया आणि नेत्यांवर टीका केल्याचा आरोप.
BJP Issues Notice Suspends Ex-Minister RK Singh
BJP Issues Notice Suspends Ex-Minister RK SinghSaam
Published On

शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला घवघवीत यश मिळालं. एनडीएला मिळालेल्या विजयानंतर अवघ्या एका दिवसांत भाजप पक्षाने मोठी कारवाई केली आहे. माजी केंद्रीय मंत्री आर के. सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाने त्यांना नोटीस पाठवली आहे. यात त्यांनी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करत स्पष्टीकरण मागितले आहे.

आर के. सिंह हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षीय कार्यात सक्रीय नव्हते. त्यांची वागणूकीवरूनच ही कारवाई करण्यात आली आहे. यांच्यासह भाजपने एमएलसी अशोक अग्रवाल आणि कटिहारच्या महापौर उषा अग्रवाल यांनाही कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

BJP Issues Notice Suspends Ex-Minister RK Singh
मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

भाजपने पाठवलेल्या नोटीसमध्ये आर के. सिंह यांना स्पष्टपणे सांगितले की, 'आर के. सिंह यांच्या हालचाली पक्षविरोधी होते. या गोष्टी गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत. याच कारणामुळे त्यांना निलंबित करण्यात येत आहे'. दरम्यान, त्यांना पक्षातून बेदखल का करू नये? याचे स्पष्टीकरण देण्यासही सांगितले आहे.

BJP Issues Notice Suspends Ex-Minister RK Singh
Accident: भरधाव कार धरणात कोसळली, ४ पोलिसांचा बुडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

निवडणुकीदरम्यान, आर के. सिंह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर काही प्रश्न उपस्थित केले होते. तारापूर येथे त्यांनी जनतेला सम्राट चौधरी यांना मतदान करून नये, असे आवाहन केले होते. अनंत सिंह, विभा देवी यांसारख्या वादग्रस्त आणि कलंकित व्यक्तींना तिकिटे देण्याच्या एनडीएच्या निर्णयावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. तसेच शहाबाद मतदारसंघातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनाही ते गैरहजर राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com