Accident: भरधाव कार धरणात कोसळली, ४ पोलिसांचा बुडून मृत्यू; नेमकं काय घडलं?

Four Policemen Drown After Car Falls Into Hatia Dam: झारखंडच्या रांचीतील हटिया धरणाजवळ कार कोसळली. चार पोलिसांचा दुर्देवी मृत्यू.
Four Policemen Drown After Car Falls Into Hatia Dam
Four Policemen Drown After Car Falls Into Hatia DamSaam
Published On
Summary
  • झारखंडच्या रांचीतून दुर्देवी घटना समोर

  • हटिया धरणात कार कोसळली

  • चार जणांचा मृत्यू

झारखंडची राजधानी रांची येथून एक दु:खद घटना समोर आली आहे. हटिया धरणात चार पोलिसांचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, एका पोलिसाचा अद्याप शोध लागलेला नाही. वृत्तानुसार, चार पोलीस एका चारचाकीतून प्रवास करीत होते. प्रवास करत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी थेट धरणात जाऊन कोसळली. यामुळे चौघेही पाण्यात बुडाले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी चार पोलीस एका कारमधून प्रवास करीत होते. त्यांची गाडी हटिया धरणाजवळ पोहोचताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. कार थेट धरणात पडली. कार बुडाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केला. शोधकार्यादरम्यान, तीन पोलिसांचे मृतदेह पोलिसांना सापडले.

Four Policemen Drown After Car Falls Into Hatia Dam
चारचाकीचं नियंत्रण सुटलं, एक्स्प्रेस वेवरून कार थेट खड्ड्यात कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू | VIDEO व्हायरल

मात्र, चौथ्या पोलिसाचा मृतदेह सापडला नाही. चौथ्या पोलिसाचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या चौथ्या पोलिसाच्या मृतदेहाचा तपास सुरू आहे. ४ पोलिसांचा मृतदेह आढळल्यानं गावातून शोककळा व्यक्त केली जात आहे. तसेच पोलिसांच्या कुटुंबावर देखील दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

Four Policemen Drown After Car Falls Into Hatia Dam
गरिबांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा डोळा, घरकुल मंजुरीसाठी आदिवासींकडून पैशांची मागणी, व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, चार पोलिसांपैकी २ जण न्यायिक अधिकाऱ्यांचे बॉडीगार्ड होते. तर, एक सरकारी चालक होता. धरणात वाहन बुडाल्यानं चौघांचाही मृत्यू झाला. उपेंद्र कुमार आणि रॉबिन कुजू अशी मृत पोलिसांची नावे आहेत. सध्या शोधमोहिम आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com