गरिबांच्या पैशांवर अधिकाऱ्यांचा डोळा, घरकुल मंजुरीसाठी आदिवासींकडून पैशांची मागणी, व्हिडिओ

Corruption in Housing Scheme: आदिवासींना घरकुल मंजूर करण्यासाठी सरकारी बाबू पैसे घेत असल्याचा संतापजनक प्रकार अंबरनाथ तालुक्यातील राहटोली ग्रामपंचायत हद्दीत घडलाय.
Corruption in Housing Scheme
Corruption in Housing SchemeSaam
Published On

मयुरेश कडव, साम टिव्ही

बदलापुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. घरकुल मंजुरीसाठी आदिवासींकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बदलापूरजवळील राहटोली ग्रामपंचायतीमधील हा संतापजनक प्रकार असून, ग्रामपंचायतीचा लिपिक आदीवासींकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यातील राहटोली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाडीमध्ये घरकुल मंजूर करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या लिपिकाने प्रत्येकी १२ हजार मागितले असल्याचे उघड झाले आहे. तर, याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लिपिक हवेश जाधव हे पैसे कोणाला-किती द्यावे लागतील याची यादीच देताना दिसतो आहे.

Corruption in Housing Scheme
डोक्यात गोळी घातली, गाडीतून बाहेर फेकलं अन्...., पुण्यातील हत्याकांडाचा भयानक CCTV समोर

हवेश सांगतोय की, 'जो अधिकारी जागेवर येईल त्याला पैसे द्यावे लागणार. तसेच एफिडेव्हीटसाठी १ हजार रुपये, ग्रामविकास अधिकाऱ्याला ५ हजार आणि ठाण्यामधील जे अधिकारी घरकुल मंजूर करतात त्यांना ५ हजार असे १० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. तसेच ग्रामसेवकालाही खुशीने आपल्याला पैसे द्यावे लागतील', असं हा लिपिक या आदिवासींना सांगताना दिसत आहे.

Corruption in Housing Scheme
Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

दिवसभर मजुरी करून जगणाऱ्या आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या आदिवासी कुटुंबांकडून अशा प्रकारे पैसे उकळल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकारात सामील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com