Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

Driver Repeatedly Assault Maid Using Objectionable Videos: दक्षिण मुंबईत घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार. ड्रायव्हरकडून अत्याचार. व्हिडिओ काढून ब्लॅकमेलही केलं.
Crime
CrimeSaam Tv
Published On

दक्षिण मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३५ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर विवाहित ड्रायव्हरने बलात्कार केला आहे. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ काढून आरोपीनं वारंवार तिच्यावर अत्याचार केला आहे. आरोपी हा विवाहित ड्रायव्हर असून, पीडित महिला ज्या घरात काम करते, त्याच मालकाकडे आरोपी ड्रायव्हर म्हणून काम करत होता. दोघेही बिहारचे रहिवासी असून, आरोपीला बलात्कार आणि ब्लॅकमेल करणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

एमआरए मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४साली आरोपीने पीडितेला धार्मिक विधी करण्याचे सांगून फोर्ट परिसरातील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे आरोपीने तिला ड्रग्ज घातलेले पेय दिले. काही क्षणात महिला बेशुद्ध पडली. आरोपीनं रूममध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानं बलात्कार करत असताना फोटो आणि व्हिडिओही शुट केले.

Crime
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

या घटनेनंतर आरोपीनं आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओच्या आधारे पीडितेला ब्लॅकमेल केलं. आरोपी वारंवार पीडित महिलेवर बलात्कार करत होता. तिला हॉटेलमध्ये नेत तिच्या शरीराचे लचके तोडत होता. अखेर आरोपीच्या कृत्यांना कंटाळून पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेण्याचा निर्णय घेतला. पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पोलिसांना आपबिती सांगितली.

Crime
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराच्या घरातच फूट; काकांनी सोडली साथ, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली

पीएसआय अनिल राठौड आणि पीएसआय वसंती जाधव यांच्या नेतृत्वाखाली एमआरए मार्ग पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला बालेश्वर येथून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून एक मोबाईल आणि फोन जप्त केला आहे. जो पोलिसांना फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीनं इतर कोणत्याही महिलांसोबत असेच कृत्य केलं आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Crime
थांबायचं नाही! ठाकरे बंधूंना भाजपकडून जबरदस्त धक्का, बड्या नेत्यांनी धरली भाजपची वाट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com