

लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणी मोठी अपडेट
सुरक्षा दलांची मोठी कारवाई
मास्टरमाईंड उमर मोहम्मदचे घर उडवले
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण जगाला हादरवलं. या प्रकरणाचा एजन्सींकडून कसून तपास सुरू आहे. दरम्यान, या बॉम्ब स्फोट प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी आयईडीने उडवून दिले आहे. दहशतवादविरूद्धच्या कारवाईचा एक भाग म्हणून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. तसेच डॉ. उमरचे घर उडवले. मिळालेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पडली.
या स्फोटाच्या तपासात अनेक महत्वाचे खुलासे झाले आहेत. गुरूवारी फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळली. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहिन शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. ज्याला आधीच 'व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल' प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे.
फरीदाबाद पोलिसांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलीस विद्यापीठात सापडलेल्या संशयास्पद मारूती ब्रेझा कारची चौकशी करत आहेत. संशयास्पद कार आढळल्यानंतर, बॉम्ब शोध पथकाला वाहनाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या इतर वाहनांची देखील तपासणी केली जात आहे.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी एका एन्क्रिप्टेड स्विग्स मेसेजिंग अॅपद्वारे त्यांच्या दहशतवादी मोहिमेचे नियोजन आखले. स्फोटस्थळावरून मिळालेल्या डीएनए नमुन्यांवरून, डॉ. उमर लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेली पांढऱ्या रंगाची हुंडई आय २० कार चालवत होते. सध्या या प्रकरणातून आणखी कोणती मोठी माहिती लागते का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.