शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराच्या घरातच फूट; काकांनी सोडली साथ, नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढली

Big Jolt to NCP & Thackeray Sena: नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांचे सख्खे काका भाजपच्या गळाला.
Big Jolt to NCP & Thackeray Sena
Big Jolt to NCP & Thackeray SenaSaam
Published On
Summary
  • नाशिकच्या सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग

  • राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका भाजपच्या गळाला

  • शिवसेना ठाकरे गटाला धक्का

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलंय. नुकतेच नगरपंचायतीच्या तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. डिसेंबर महिन्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. दरम्यान, निवडणुकीसाठी मतदारांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी महाविकास तसेच महाआघाडीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षांतरालाही जोमानं वेग आला आहे.

नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या घरातच फूट पडली आहे. वाजे यांच्या सख्ख्या काकांनेच पक्षाची साथ सोडत भाजपची साथ दिली आहे. यामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे फिरणार आहेत.

नाशिकच्या सिन्नर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सख्खे काका आणि सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार हेमंत वाजे भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Big Jolt to NCP & Thackeray Sena
मंत्र्यांकडूनच मतदार यादीत घोळ; अंबादास दानवेंचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

हेमंत वाजे यांनी यापूर्वी सिन्नर नगराध्यक्ष आणि गटनेता अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. स्थानिक पातळीवर वाजे यांचा मोठा जनाधार मानला जातो. त्यांच्या प्रवेशासाठी भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी स्वत: पुढाकार घेतलं असल्याचं बोललं जात आहे. पुढाकार घेत त्यांनी मोठी खेळी खेळल्याचे म्हटलं जात आहे.

Big Jolt to NCP & Thackeray Sena
'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

हेमंत वाजे यांच्या प्रवेशाने शिवसेना ठाकरे गटाबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील मोठा धक्का बसला आहे. सिन्नर नगरपरिशदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी हेमंत वाजे यांच्यासारख्या तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे नसल्याने, राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींचा थेट परिणाम माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय गणितावरही होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com