'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; सोलापुरातील वकिलानं आयुष्याचा दोर कापला, २ पानी चिठ्ठीत सगळंच सांगितलं

Lawyer Hangs Himself, Leaves 2-Page Note Blaming Mother: सोलापुरात आईकडून मिळत असलेल्या दुजाभाव वागणुकीतून एका वकिलानं आयुष्याचा दोर कापला. २ पानी सुसाईड नोटमधून माहिती उघड.
Lawyer Hangs Himself Leaves 2-Page Note Blaming Mother
Lawyer Hangs Himself Leaves 2-Page Note Blaming MotherSaam
Published On
Summary
  • वकिलाने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली

  • आत्महत्येपूर्वी आईविरोधात दोन पानी सुसाईड नोट लिहिली

  • विजापूर पोलिसांकडून तपास सुरू

सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका वकिलानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं चिठ्ठी लिहिली होती. आईकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यानं चिठ्ठीत नमुद केलं आहे. त्यानं आत्महत्येस कारणीभूत आईला ठरवलं आहे, असं दोन पानी चिठ्ठीतून उघड झालं आहे. सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सागर श्रीकांत मंद्रूपकर असे वकिलाचे नाव आहे. तो सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होता. मंगळवारी सागर आणि त्याचे आईचे कडाक्याचे भांडण झाले होते. आईकडून दुजाभाव वागणूक मिळत असल्याचं त्याला वाटलं. याच कारणातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरातील बेडरूममध्ये त्यानं आयुष्याचा दोर कापला.

Lawyer Hangs Himself Leaves 2-Page Note Blaming Mother
केवळ १५ दिवसांत भाजपची सोडली साथ; ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, नेमकं कारण काय?

गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली. सागर मंद्रूपकर याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत त्यानं आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिलं. चिठ्ठीत त्यानं, 'आईकडून सतत दुजाभाव मिळत आहे. यामुळे मी आयुष्य संपवत आहे. माझ्या आईला तीच जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती'.

Lawyer Hangs Himself Leaves 2-Page Note Blaming Mother
दिल्लीनंतर पाकिस्तान हादरले, स्फोटानंतर कारने घेतला पेट; वकिलासह ५ जणांचा होरपळून मृत्यू

असं २ पानी चिठ्ठीत आत्महत्या करण्यामागचं कारण सागरनं नमुद केलं. चिठ्ठी लिहून त्यानं बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा वकील असून, त्याचे वडील नोकरदार आहेत. तर, सागरची बहीण विवाहित आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली. सोलापुरातील सिविल पोलीस चौकी येथे घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास विजापूर नाका पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com