दिल्लीनंतर पाकिस्तान हादरले, स्फोटानंतर कारने घेतला पेट; वकिलासह ५ जणांचा होरपळून मृत्यू

Massive Blast Near Islamabad District Court: पाकिस्तानच्या इस्लामाबाद जिल्हा न्यायालयाबाहेर स्फोट. कारनं घेतला पेट. ५ जणांचा मृत्यू. २० जखमी.
Massive Blast Near Islamabad District Court
Massive Blast Near Islamabad District CourtSaam
Published On
Summary
  • इस्लाबाद जिल्हा न्यायालयाबाहेर कारमध्ये स्फोट

  • स्फोटात ५ जणांचा मृत्यू

  • स्फोट नेमका घडला कसा?

  • पोलिसांकडून तपास सुरू

देशाची राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटमुळे एकूण १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अशातच पाकिस्तानमधूनही एक मोठी बातमी समोर येत आहे. इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयाजवळ एका वाहनाचा मोठा स्फोट झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भीषण स्फोटमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. तर, २० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या जिल्हा न्यायालयीन संकुलाच्या गेटबाहेर जी - ११ परिसरात हा बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट एका पार्क केलेल्या कारमध्ये झाला. हा स्फोट गॅस सिलेंडरचा स्फोट किंवा बॉम्बस्फोट असल्याचा संशय आहे. अचानक स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यात एक वकील, एक चालक आणि इतर त्याच भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांचा समावेश आहे.

Massive Blast Near Islamabad District Court
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडचा फोटो समोर; नक्की कुणी कट रचला? साथीदार अन् भावांनाही अटक

हा बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवून आणला? हा स्फोट नेमका बॉम्बस्फोट होता का? याचा तपास सुरू आहे. दरम्यान, या कटात नेमकं कोण सामील होते? हे सांगणे आताच शक्य नाही. दरम्यान, जखमींची संख्या २० ते २५ असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास न्यायालयाचे कामकाज सुरू असताना हा स्फोट झाला. स्फोट घडल्यामुळे न्यायालयाच्या आवारातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जवळच उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. जखमींमध्ये बहुतांश जण वकील आणि न्यायालयाचे कर्मचारी असल्याची माहिती आहे.

Massive Blast Near Islamabad District Court
३ मुलांचा बाप अन् आईचा आधार; दिल्लीतील बॉम्बस्फोटात बस कंडक्टरचा मृत्यू, कुटुंबाचा आधार हरपला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com