डोक्यात गोळी घातली, गाडीतून बाहेर फेकलं अन्...., पुण्यातील हत्याकांडाचा भयानक CCTV समोर

CCTV Captures Brutal Killing of Nitin Gilbile: पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये थरारक घटना घडली. नितीन गिलबिले यांची मित्रांकडून गोळ्या झाडून हत्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू.
CCTV Captures Brutal Killing of Nitin Gilbile
CCTV Captures Brutal Killing of Nitin GilbileSaam
Published On

पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच पिंपरी चिंचवड येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नितीन गिलबिले याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा भयंकर सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नितीनचे मित्र त्याच्यावर गोळीबार करतात. नंतर त्याला चारचाकीमधून खाली फेकतात. तसेच चारचाकी अंगावरून नेतात. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरूवात केली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड येथील नितीन गिलबिले याच्या हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण हत्याकांडाची घटना वडमुखवाडी - अलंकापुरम रस्त्यावर घडल्याची माहिती आहे. नितीन गिलबिले याच्या हत्येचा कट रतण्यात आला. नितीनच्या मित्रांनी नितीनला फॉर्च्युनरने नेले. तसेच त्याच्यावर गोळीबार केली. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी नितीनला खाली फेकले. तसेच अंगावरून चारचाकी नेली.

CCTV Captures Brutal Killing of Nitin Gilbile
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाईंडचे घर उडवले, सुरक्षा दलांची कारवाई

नितीन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वेदनेनं विव्हळत होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीनची हत्या, अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या दोन मित्रांनी केली. तिघेही चारचाकीमध्ये होते. फॉर्च्यूनरमधून तिघेही वडमुखवाडी परिसरातून जात होते. त्यांनी निर्जनस्थळी गाडी थांबवली.

CCTV Captures Brutal Killing of Nitin Gilbile
Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

तिघांमध्ये गप्पा रंगल्या. मात्र, गप्पा मारताना तिघांमध्ये वाद सुरू झाला. प्लॉटिंगच्या कारणातून वाद चिघळला. दोन मित्रांपैकी एकाने पिस्तूल बाहेर काढली. तसेच नितीनच्या अंगावर गोळ्या घातल्या. एक गोळी डोक्यात लागली. नितीनचा जागीच मृ्त्यू झाला. एका मित्रानं नितीनला चारचाकीतून बाहेर फेकलं. तसेच अंगावरून चारचाकी नेली. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघांमध्ये वाद जमीन किंवा गुंतवणुकीवरून झाले.

या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस गुन्हे शाखेचे डीसीपी शिवाजी पवार, एसीपी विशाल हिरे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी घाव घेतली. फॉरेन्सिक टीम देखील घटास्थळी दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com