चारचाकीचं नियंत्रण सुटलं, एक्स्प्रेस वेवरून कार थेट खड्ड्यात कोसळली, ५ जणांचा जागीच मृत्यू | VIDEO व्हायरल

Delhi–Mumbai Expressway Claims Five Lives: मध्यप्रदेशातील रतलाम येथे दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात घडला. भरधाव कार थेट खड्ड्यात कोसळली. ५ जणांचा जागीच मृत्यू.
Delhi–Mumbai Expressway Claims Five Lives
Delhi–Mumbai Expressway Claims Five LivesSaam
Published On

मध्य प्रदेशातील रतलाम येथून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सकाळी भीषण रस्ता अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी एक्स्प्रेसवेवरून घसरून थेट खड्ड्यात पडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात एक १५ वर्षांचा मुलगा आणि ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ही घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली एक्स्प्रेस वेवर हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणारी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. तसेच खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना ८ वाजेच्या सुमारास भीमपूरा गावात घडली. ही कार दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं जात होती.

Delhi–Mumbai Expressway Claims Five Lives
Mumbai : धार्मिक विधीच्या नावाने हॉटेलमध्ये नेलं अन् बलात्कार केला, व्हिडिओ काढून सुरू केला ब्लॅकमेलिंगचा खेळ

एक्स्प्रेस वेवर भरधाव कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. तसेच कार खड्ड्यात जाऊन पडली. उंचावरून कार खड्ड्यात पडल्यामुळे कारचा चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले.

स्टेशन हाऊस ऑफिसर सुरेंद्र सिंह गदरिया यांनी सांगितले की, मृतांची ओळख पटली आहे. त्यांच्या कुटुंबियांना या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. अपघात नेमका घडला कसा? याचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात कारचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Delhi–Mumbai Expressway Claims Five Lives
लोकलवर लावले अश्लील पोस्टर्स; स्टॅमिना वाढवणाऱ्या औषधाची जाहिरात पाहून प्रवासी संतप्त, फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com