

लोकलमध्ये अश्लील पोस्टर्स
प्रवासी संतापले
प्रवासी संघाकडून पोस्टर्स काढण्याची मागणी
लोकल ट्रेन मुंबईची लाईफलाईन मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करतात. जस जसा काळ बदलला, तस तसे लोकलमध्येही बदलाव होत गेला. लोकलमध्ये प्रायव्हेट कंपनीच्या जाहीराती दिसू लागल्या. प्रायव्हेट कंपनीचे पोस्टर लोकलमध्ये चिटकवल्या जातात. मात्र, लोकल ट्रेन आता एका पोस्टरमुळे चर्चेत आली आहे. लोकलवर अश्लील पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
मुंबई लोकल गाड्यांमध्ये लावलेले हे पोस्टर पाहून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रवाशांनी हे पोस्टर लवकरात लवकर काढून टाकण्याची मागणी केली आहे. कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवासी संघ आणि डिव्हिजनल रेल्वे यूजर्स कंस्लटेटिव्ह कमिटीतील सदस्यांनी लोकल गाड्यांवरील अश्लील जाहिरातींविरूद्ध निषेध सुरू केला आहे.
दररोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. ज्यात शालेय, महाविद्यालयीन मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवासी संघचे अध्यक्ष राजेश घनघव यांनी सांगितले की, 'सामाजिक नियमांकडे दुर्लक्ष करून व्यावसायिक उत्पन्नाच्या नावाखाली हे करायला हवे का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रेल्वेमंत्र्यांना लिहिले पत्र
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात डीआरयूसीसीनेही हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी लिहिले की, 'जाहिरातीच्या नावाखाली अशा गोष्टी सार्वजनिकरित्या प्रदर्शित करणे चुकीचे आहे. हा प्रवाशांचा अपमान आहे. हे केवळ अश्लीलच नाही तर, निष्काळजीपणा देखील दर्शवते'.
संपूर्ण प्रकरण काय?
हा प्रकार कसारा सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये घडला. मिळालेल्या माहितीनुसार, डीआरयूसीसी सदस्य श्याम उबाळे आणि लोकल ट्रेन प्रतिनिधी युवराज पंडित यांनी या जाहिरातीविरूद्ध निषेध व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.