Shocking : पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

Odisha Palak Chicken Food Poisoning Death : ओडिशात पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील ३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलीस तपास सुरू असून विषबाधेतून मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.
Shocking : पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक
Odisha Palak Chicken Food Poisoning DeathSaam Tv
Published On
Summary
  • ओडिशात पालक-चिकनमुळे ३ जणांचा मृत्यू; विषबाधेचा संशय

  • कमी शिजवलेले चिकन संसर्ग पसरवू शकते

  • रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्यांना अधिक धोका

  • प्रकरणात पोलीस तपास सुरू

आवडीचे चमचमीत पदार्थ ताटात दिसले की आपण त्याच्यावर तुटून पडतो. मात्र ते अतिप्रमाणत खाल्लं की वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागत. अशीच एक घटना ओडिशात घडली आहे. पालक चिकन खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील इटप गावात एका कुटुंबाने पालक चिकन खाल्लं. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. तिघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात हा मृत्यू पालक चिकन खाल्ल्यामुळे त्यातून विषबाधा झाली असल्याचं समोर आलं आहे.

Shocking : पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक
Shocking : बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने इंजिनीअर नवरा भडकला; भिंतीवर डोकं आपटून बायकोला संपवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

चिकन आणि पालक दोन्हीही पौष्टिकतेने समृद्ध आहेत, परंतु जर ते योग्यरित्या स्वच्छ, शिजवलेले आणि साठवले नाही तर हे पदार्थ घातक ठरू शकतात. डॉ. श्रीनिवास बीजे, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, एचसीएच कॅन्सर हॉस्पिटल, केआर रोड, बेंगळुरू यांच्या मते , अन्नातून विषबाधा अनेकदा दुर्लक्षित केली जाते, ही एक गंभीर समस्या आहे, जी तुमच्या जीवावर बेतू शकते.

Shocking : पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक
Today Winter Temprature : राज्यात थंडीचा पारा घसरला! कमाल तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

डॉक्टरांच्या मते, कच्चे किंवा कमी शिजवलेले चिकन हे साल्मोनेला, कॅम्पिलोबॅक्टर आणि क्लोस्ट्रिडियम परफ्रिंजन्स सारख्या अनेक धोकादायक जीवाणूंचे स्रोत असू शकते. जर चिकन पूर्णपणे शिजवले नसेल किंवा इतर वस्तू चाकू, कटिंग बोर्ड किंवा कच्च्या चिकनच्या संपर्कात आलेल्या हातांनी हाताळल्या तर संसर्ग पसरू शकतो. वृद्ध, मुले आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांमध्ये, हा संसर्ग वेगाने वाढू शकतो, ज्यामुळे सेप्सिस, अवयव निकामी होणे आणि मृत्यू देखील होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, जेव्हा चिकन आणि पालक सारखे पदार्थ एकत्र तयार केले जातात तेव्हा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com