गोवंडीत शुल्लक कारणावरून पत्नीची हत्या
बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने पती-पत्नीमध्ये वाद
पतीने डोकं भिंतीवर आदळल्याने तरुणीचा मृत्यू
शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेलं; डॉक्टरांनी मृत घोषित केलं
आरोपी इंजिनियर पती पोलिसांच्या ताब्यात
असं म्हणतात भरल्या घरात भांड्याला भांडं लागताच. म्हणजेच कुटुंबात नेहमीच छोट्या छोट्या कारणावरून भांडण होतात. मात्र शुल्लक कारणावरून झालेला वाद टोकाला गेला तर अनर्थ घडतो. अशीच एक मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिर्याणीत मीठ पडल्याच्या शुल्लक कारणावरून इंजिनीयरने स्वतःच्या पत्नीची हत्या केली. सदर घटना ही मुंबईतील गोवंडी येथे घडली असून आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव मंजर इमाम हुसैन (वर्ष २३) असं आहे. तो एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करतो. मंजरचं २० वर्षांच्या नाझीया परवीन सोबत लग्न झालं होत. ती मुळची उत्तर प्रदेशच्या कुशीनगरची होती. नाझीया तिच्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती.
तिचे वडील सौदी अरेबियात नोकरी करतात. तर आई लहान भाऊ आणि बहिणीला सांभाळते. लग्न झाल्यापासून या दोघांमध्ये किरकोळ खटके उडायचे. मात्र शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी नाझीयाने रात्रीच्या जेवणाला बिर्याणी बनवलेली. त्यामध्ये मीठ जास्त झालं म्हणून मंजर आणि नाझीयाचं कडाक्याचं भांडण झालं.
हे भांडण एवढ टोकाला गेलं की, मंजरने पत्नीचं डोकं भिंतीवर आदळलं. त्यात तिला जबर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांना भांडणाचा आवाज गेल्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केला. जखमी झालेल्या पत्नीला शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली. मात्र तिथे गेल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नाझियाचा नवरा मंजर याला रविवारी २१ डिसेंबर रोजी बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.