कोल्हापूर–मुंबई खासगी बसमध्ये सिनेस्टाईल दरोडा
मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून बस थांबवली
३४ किलो चांदीसह १.२२ कोटींचा ऐवज लंपास
खासगी बस सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या बसमधून कोट्यवधींची लूटमार झाली असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरहून मुंबईला सायनला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा काही चोरट्यांनी सिने स्टाईल पाठलाग करून, प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा दस्तऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस कोल्हापूरहून मुंबईला सायनला जाणार होती. पुढे सायनवरून भायखळ्याला जाणार होती. परंतु कोल्हापूरच्या किणी गावात काल मध्यरात्री १२ वाजता हा प्रकार घडला. तावडे हॉटेलजवळ तीन अनोळखी व्यक्ती बसमध्ये बसले.
ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील भुताचा माळ परिसरात आली असता बसमधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. पाठीमागून पाच ते सहा गुंड सिनेस्टाईलने बसचा पाठलाग करत आले. हे पाच सहाजणही थांबलेल्या बसमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांवर अरेरावीला सुरुवात केली.
या सर्वांनी बसमधील सुतळी बारदानातील ३४ किलो वजनाची चांदी, प्लॅस्टिक पोत्यातील २६ किलो वजनाची चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, तसेच एक मोबाईल हँडसेट असा सुमारे असा सुमारे १ कोटी २२ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पसार होताना संशयित दरोडेखोरानी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही, नाहीतर जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली.
त्यामुळे घाबरलेल्या बस चालकांनी बस पुढे नेली. त्यानंतर बस चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव इथं थांबून सांगली जिल्ह्यातील ११२ क्रमांकावर फोन करून सांगली पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात असून पोलीस तपास करत आहेत. या घटनेने बस चालकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं असून खासगी बस कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.