8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? इतका वाढणार पगार

8th Pay Commission Salary Hike: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. आठव्या वेतन आयोगात प्रत्यक्ष पगारवाढ कधीपासून होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

फिटमेंट फॅक्टर किती होणार?

पगारवाढ किती येणार?

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू केला आहे. दरम्यान, या योजनेत पगारवाढ कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. फिटमेंट फॅक्टर किती असणार त्यावर पगारवाढ आणि एरियर ठरवला जातो. दरम्यान, फिटमेंट फॅक्टर किती असणार याबाबत अनेक तर्क लावते जात आहेत.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख आली समोर

काही मिडिया रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर ३.२५, २.८६ किंवा २.२८ होऊ शकतो. दरम्यान, सध्याची महागाई आणि येत्या महामाई भत्त्यानुसार महागाई भत्ता ठरवला जातो. सध्याच्या परिस्थितीनुसार फिटमेंट फॅक्टर १.९० ते १.९२ होण्याची शक्यता आहे. यामुळे पगार किती वाढणार हे जाणून घ्या.

पगार किती वाढणार?

दुसऱ्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंत सरासरी पगार २७ टक्क्यांनी वाढला आहे. सातव्या वेतन आयोगात एकूण पगारवाढ १४.२७ टक्के झाली आहे. दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगात किती फिटमेंट फॅक्टरची शिफारस होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सध्या जानेवारी २०२६ साठी महागाई भत्ता ६० टक्के असू शकतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात १८ टक्के पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. जर फिटमेंट फॅक्टर जास्त असेल तर पगारवाढ २४ टक्क्यापर्यंत होऊ शकतो. याची शक्यता खूपच कमी आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? प्रत्येक लेव्हलसाठी पगारवाढ वेगळी होणार

फिटमेंट फॅक्टर किती असणार? (Fitment Factor)

आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा महागाई भत्त्यावर अवलंबून असेल. त्यानुसार पगारात किती वाढ होणार हे ठरवले जाते. जर महागाई भत्ता ६० टक्के असेल तर पगारात १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत फिटमेंट फॅक्टर १.९० असेल. फिटमेंट फॅक्टर बेसिक सॅलरीला गुणून नवीन पगार निश्चित केला जाणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मेडिकल अलाउंस २०,००० रुपयांपर्यंत वाढणार; जाणून घ्या ८ व्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com