

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट
फिटमेंट फॅक्टर किती असणार?
पगार कितीने वाढणार?
आठव्या वेतन आयोगाबाबत आता अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. फिटमेंट फॅक्टर किती असणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, याबाबत आज बैठक होणार आहे. आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यावरुन फिटमेंट फॅक्टर किती असेल, पगार किती वाढेल, याबाबत निर्णय होऊ शकतो.
फिटमेंट फॅक्टर किती होणार? (8th Pay Commission Fitmet Factor Calculation)
फिटमेंट फॅक्टर हा जुन्या बेसिक सॅलरीला गुणला जातो. त्यानंतर नवीन बेसिक सॅलरी निश्चित केली जाते. जर लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी १८००० रुपये आहे. त्यावर महागाई भत्ता ६० टक्के म्हणजे एकूण २८८०० रुपये मिळतात. दरम्यान, १.६ टक्के फिटमेंट फॅक्टर आधीच लागू आहे. यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
कर्मचारी संघटनेने अनेक मागण्या केल्या आहेत. यामध्ये सध्या तीन सदस्यांसाठी पगार निश्चित करण्यात आला आहे. मात्र, पाच सदस्यांच्या आधारावर पगार निश्चित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. जर कुटुंबातील सदस्यांची संख्या ३ वरुन ५ केली तर एकूण खर्च ६६ टक्के वाढणार आहे.
कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर फिटमेंट फॅक्टर आपोआप वाढला जाऊ शकतो. कमीत कमी फिटमेंट फॅक्टर २.२६ ठरु शकतो. यामध्ये जर २४ टक्क्यांची वाढ जोडली तर फिटमेंट फॅक्टर २.५ पर्यंत जाऊ शकतो.
प्रत्येक लेव्हलसाठी वेगळा फिटमेंट फॅक्टर
पे स्केलमध्ये १८ लेव्हल आहेत. यामध्ये वेगवेगळ्या बँडसाठी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर निश्चित होऊ शकतो. लेव्हल १ ते ५, ६ ते ८ आणि त्यानंतरच्या लेव्हलसाठी वेगळा फिटमेंट फॅक्टर निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.