8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची बातमी! 'या' तारखेपर्यंत होऊ शकतो आठवा वेतन आयोग लागू; पगार कितीने वाढणार?

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगात शिफारसी डिसेंबर २०२६ पर्यंत सादर केल्या जाऊ शकतात.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On

केंद्रीय कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाचा फायदा ५०.१४ लाख सरकारी कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, वेतन आयोगाची समिती शिफारसींचा रिपोर्ट डिसेंबर २०२६ पर्यंत सरकारकडे सोपवू शकते. यानंतर कर्मचाऱ्यांची पगारवाढ होईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

पॅनलची तयारी सुरु

कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे केले आहे. लवकरच जॉइंट कंसल्टेटिव्ह मशीनरीची नॅशनल काउंसिल बैठक होणार आहे. यामध्ये अंतिम शिफारसी तयार करुन केंद्र सरकारला दिल्या जातील. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती तयार केली आहे. ही समिती शिफारसी तयार करणार आहे.

कधीपर्यंत येणार रिपोर्ट?

सरकारने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजुरी दिली. यानंतर रिपोर्टसाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. दरम्यान, हा रिपोर्ट याआधी होऊ शकतो, असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: ना पगार, ना भत्ता; आठव्या वेतन आयोगाचा या कर्मचाऱ्यांना मिळणार नाही फायदा; वाचा सविस्तर

फिटमेंट फॅक्टरवर पगार ठरणार

कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सातव्या वेतन आयोगात २.५७ होता. यामुळे पगार १४ ते १६ टक्के वाढणार आहे. दरम्यान, आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.८३ ते ३.० होऊ शकतो.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचा पे लेव्हल १ ते १८ नुसार पगारात २० ते ३५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्यामुळे अनेक लोकांचा पगार लाखांच्या घरात जाऊ शकतो. दरम्यान, आता फिटमेंट फॅक्टर किती ठरणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com