8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ २०२७ पासून लागू केली जाऊ शकते.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून येणार?

एरियर किती मिळणार?

किती महिन्यांचा एरियर मिळणार?

केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहे. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार,एरियर कधी आणि किती मिळणार असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. दरम्यान, यासाठी अजून वेळ लागू शकते. सरकारने २०२५ नोव्हेंबरमध्ये आठव्या वेतन आयोगाची समिती स्थान केले.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

आठव्या वेतन आयोगाची समिती ही कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत शिफारसी सादर केल्या जाणार आहेत.या शिफारसींना मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. आठव्या वेतन आयोगाच्या समितीला शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना १८ महिन्यानंतरच पगारवाढ मिळणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार,आयोग २०२६ च्या शेवटी डिसेंबरमध्ये शिफारसी सादर करु शकतात. या शिफारसी २०२७ मध्ये लागू होण्याची शक्यता आहे.

कधीपर्यंत मिळणार एरियर?

जर १८ महिन्यात शिफारसींचा रिपोर्ट सादर केला त्यानंतर केंद्र सरकारने मंजुरी द्यायची हवी.यासाठी बराच वेळ लागू शकतो. दरम्यान, एरियर हा १ जानेवारी २०२६ पासून मोजला जाईल.

मिडिया रिपोर्टनुसार, GenZCFOचे संस्थापक CA मनीष मिश्रा यांनी सागितले की, एरियर १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. सातवा वेतन आयोग संपल्यानंतर लगेचच आठव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ लागू होते.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा, खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होणार परिणाम, कसं? वाचा सविस्तर

पगार किती वाढणार? (8th Pay Commission Salary Hike)

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.४ ते ३.० होण्याची शक्यता आहे.यामुळे तुमचा पगार ३० ते ३५ टक्के वाढू शकतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com