Bihar 6 Childrem Death Saam Tv
देश विदेश

Shocking: स्नानासाठी तलावात डुबकी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ६ मुलांचा बुडून मृत्यू

Bihar 6 Childrem Death: बिहारमध्ये तलावात बुडून ६ जणांचा मृत्यू झाला. स्नान करण्यासाठी या सर्वांनी तलावात उडी घेतली पण ते बाहेर आले नाहीत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More
  • बिहार भागलपूर तलावात ६ मुलांचा बुडून मृत्यू

  • कर्म-धर्म पर्वासाठी स्नान करताना घडली घटना

  • या घनटेनंत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

  • घटनास्थळी मृतांच्या कुटुंबीयांना टाहो फोडला

बिहारमध्ये ६ मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. भागलपूर जिल्ह्यातील सुल्तानगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मृतांमध्ये ३ मुलं आणि ३ मुलींचा समावेश आहे. कर्म-धर्म पर्वदरम्यान या सहाही जण स्नान करण्यासाठी तलावात उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहाही जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या भागलपूर येथे सोमवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली. तलावात बुडून सहा मुलांचा मृत्यू झाला. हे सर्वजण अंघोळीसाठी तलावात उतरले पण त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी टाहो फोडला. घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. सहाही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ज्योती कुमारी, मीनाक्षी कुमारी, आयुष कुमार, राहुल कुमार, पूजा कुमारी आणि विकास कुमार अशी मृत मुलांची नावं आहेत. ज्योती कुमारी या एका मुलीला वगळता बाकी सर्व मुले विष्णू टोला वॉर्ड क्रमांक २७ चे रहिवासी होते. राहुल आणि पूजा ही सख्खी भावंडे होती. मिळालेल्या माहितीनुसार, कर्म-धर्म उत्सवानिमित्त ही मुले एका तलावात स्नान करण्यासाठी गेली होती. ते सर्व एकत्र होते. अचानक, एक मुलगा खोल पाण्यात गेला. त्याला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी इतर मुलांनीही पाण्यात उडी मारली ज्यामुळे ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने गावकरी आणि नातेवाईक घटनास्थळी धाव घेतली. सर्व मुले वेगवेगळ्या कुटुंबांतील होती. स्थानिकांनी मुलांना तलावातून बाहेर काढले. माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. मुलांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृत मुलं १२ ते १३ वयोगटातील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT