रिल सिंघम विरुद्ध रिअल सिंघम, मुंढेंचा थेट बॉलिवूडला दणका

Reel Singham vs Real Singham: पान मसाल्याच्या जाहीरातीमुळे अभिनेता अजय देवगण आणि टायगर श्रॉफच्या अडचणी वाढत चालतेत...अशातच रिल सिंघमनं रिअल सिंघमाला थेट आव्हान दिलयं.... बॉलीवूडचा सिंघम असणाऱ्या अजय देवगणनं कारवाईविरोधात कोर्टात याचिका दाखल गेल्यानं कसा वाद पेटलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
AJAY DEVGN VS FDA
AJAY DEVGN VS FDAsaam tv
Published On: 

सिनेमाच्या पडद्यावर खाकी वर्दी घालून गुंडांना सळो की पळो करून सोडणाऱ्या रिल सिंघम अजय देवगणला रिअल सिंघम तुकाराम मुंढेंनी घाम फोडलाय. 'बोलो जुबां केसरी' म्हणत पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या बॉलिवुडच्या कलाकारांना मुंढेंनी दणका देत नोटीस बजावलीय. आजवर मुंढेंच्या कामाचा आवाका आणि कारवाईचा धडाका पाहता बॉलिवुडची सिंघम थेट कोर्टात गेला असला तरी पण तरीही तुकाराम मुंढेंनी मात्र या बॉलिवुडच्या कलाकारांना सुनावलंय.

राज्यात पान मसाला आणि विमलच्या जाहिरातींवर कडक कायदेशीर निर्बंध असतानाही, कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातींसाठी कॅन्सर विकणाऱ्या सेलिब्रिटींना एफडीने थेट कारणे दाखवा नोटीस बजावली. विमल इलायचीची ही जाहिरात वरकरणी निरुपद्रवी वाटत असली, तरीही या ब्रँडचा मूळ संबंध थेट विषारी पानमसाल्याशी निगडित आहे. याच अनुषंगाने एफडीएकडून या अभिनेत्यांना ऑगस्ट महिन्यात नोटीस पाठवून कागदपत्रे सादर करण्यास बजावण्यात आले होते.

महाराष्ट्रात काय आहेत एफडीएचे कठोर नियम?

राज्यात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे कायदेशीर प्रतिबंध

तंबाखूजन्य पदार्थांच्या ब्रँडचे प्रमोशन किंवा समर्थन करण्यावर सक्त मनाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद

अशा प्रकारे तंबाखूजन्य उत्पादनांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर निर्बंध असताना शाहरुख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांनी या जाहिराती केल्याने त्यांना या नोटिसा धाडण्यात आल्या. यापूर्वी २०२२ मध्ये, अशाच जाहिरातीत झळकल्यामुळे अक्षय कुमारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्याने माफी मागून तो वाद संपवला. शाहरुख आणि टायगरने वेळ मागून घेतली खरी, पण बॉलिवूडच्या या सिंघमने मात्र थेट एफडीएलाच न्यायालयात खेचले! अजय देवगनं एफडीएनं मनमानी करत कारवाईचा बडगा उगारल्याचं म्हणत एफडीयच्या नोटीसी विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये, यावर आता ४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

हे प्रकरण जरी आता कोर्टात गेलं असलं तरी एक भयानक सत्य समोर ठेवणे गरजेचंय.... जगभरात तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ३० टक्के केसेस एकट्या भारतात समोर येतात. राष्ट्रीय डेटा रजिस्ट्रीनुसार, आपल्या देशात दरवर्षी १ लाख ४३ हजार नवीन केसेस नोंदवल्या जातात, त्यातील तब्बल ८० हजार लोकांचा केवळ या तंबाखूमुळे दरवर्षी मृत्यू होतोय अशा वेळी, कॅन्सर वाढीस कारणीभूत असणाऱ्या सर्वच घटकांवर कडक कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कारण कायदा सर्वांसाठी समान आहे. आता या कायदेशीर लढाईत रिअल सिंघम जिंकतो की पडद्यावरचा रील सिंघम बाजी मारतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.