रेल्वे स्टेशनवर तरुणांची स्टंटबाजी, सोशल मीडियावर लाईक्ससाठी जीवघेणा खेळ

Churchgate Railway Station Stunt Video Goes Viral: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा रेल्वे स्टेशनवरील स्टंटबाजीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय...त्या व्हिडिओत एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर माकडासारख्या उड्या मारणाऱ्या तरुणामुळे रेल्वे पोलिसांचा निष्काळजीपणा कसा उघड झालाय...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
CHURCHGATE RAILWAY STATION STUNT VIDEO VIRAL
CHURCHGATE RAILWAY STATION STUNT VIDEO VIRALsaam tv
Published On: 

हा व्हिडिओ नीट पाहा... पाहिलतं... गर्दीच ठिकाण असणाऱ्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर हा तरुण एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लांबच लांब उड्या मारतोय....आजूबाजूला लोकांची गर्दी... रुळावर लोकल येण्याची वेळ तरीही रशीद पठाण नावाचा हा मस्तवाल तरुण दिवसाढवळ्या स्टंट करतो आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी स्टेशन परिसरात लांब लांब पर्यंत कुठेच दिसत नाहीत... एक दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी हाच तरुण प्लॅटफॉर्मवर ही स्टंटबाजी करताना दिसतोय.

@rashid_khan_4685 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे स्टंटचे व्हिडिओ या तरुणानं बिनदिक्कतपणे शेअर केले...मात्र व्हिडिओवरून अनेकांनी संताप व्यक्त केल्यानंतर कारवाईच्या भीतीनं या तरुणानं स्टंटचे व्हिडिओ डिलीट केलेत...

मात्र सोशल मीडियावर लाईक्स, कमेंट्स आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक तरुण वारंवार अशी स्टंटबाजी करताना दिसत असतात..अशा स्टंटबाजांना वेळीच पोलिसांकडून आवर का घातला जात नाही..यासंदर्भात पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या तरुणावर कारवाई केली जाईल, असं जरी सांगितल असलं तरी .अशा स्टंटबाजांमुळे इतर प्रवाशांच्या जिवीताला धोका निर्माण झाला असता तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे या स्टंटबाजांना चाप लावण्यासाठी प्लॅटफॉर्मवर रेल्वे पोलिस तैनात केले पाहिजेत आणि या पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला पाहिजे तरच अशा घटना रोखल्या जातील नाहीतर सार्वजनिक मालमत्ता समजत रेल्वेस्थानकात रिल करणाऱ्या राशिदची संख्या वाढतच राहिल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.