NDA candidate Seema Singh disqualified from Madhaura seat ahead of Bihar elections; nomination papers rejected. X
देश विदेश

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Bihar Elections: मढौरा विधानसभा मतदारसंघात एनडीए आणि महाआघाडीमध्ये थेट लढत होणार होती. परंतु आता या जागेवर सीमा सिंह या निवडणूक न लढता पराभूत झाल्या आहेत. काय आहे कारण ते जाणून घेऊन.

Bharat Jadhav

  • मढौरा मतदारसंघात एनडीएला धक्का.

  • एनडीएच्या सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज रद्द.

  • बिहारमधील एनडीएची निवडणूक रणनीती चर्चेत आलीय.

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीएला मोठा धक्का बसलाय. छपरा जिल्ह्यातील मढौरा विधानसभा मतदारसंघातील एनडीएचा उमेदवार पराभूत झाला आहे. उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या जागेवरून लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) उमेदवार सीमा सिंह या निवडणुकाच्या मैदानात उतरल्या होत्या. मात्र त्या पराभूतच झाल्याचं म्हटलं जात आहे.

उमेदवारी अर्ज का झाला रद्द,एनडीएने एक जागा कशी गमावली?

उमेदवारांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. यादरम्यान सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. सीमा सिंह यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर, मढैरा मतदारसंघात एनडीएची स्थिती कमकुवत मानली जातेय. या जागेवर पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मढौरा मतदारसंघात एनडीए आणि महाआघाडीत थेट लढत होणार होती. परंतु सीमा सिंह यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानं एनडीएला मोठा धक्का बसलाय. येथे आता थेट लढत राजद आणि जनसुराज पक्ष यांच्यात होईल. मढौरा येथे राजद उमेदवार जितेंद्र कुमार राय आहेत, जे विद्यमान आमदार आणि बिहार सरकारमधील माजी मंत्री आहेत.

कोण आहे सीमा सिंग ?

सीमा सिंगला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणून ओळखले जाते. ती तिच्या ग्लॅमरस लूक आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते. तिला भोजपुरी चित्रपटसृष्टीची सनी लिओनी म्हणूनही ओळखले जाते. सीमाने भोजपुरी स्टार निरहुआसोबतही काम केले आहे. निरहुआचा सुपरहिट चित्रपट "निरहुआ रिक्शेवाला" मधील "मिसर जी तू तो बाद बडा थंडा" या गाण्याने तिला प्रसिद्धी मिळाली. यातील तिच्या नृत्य कौशल्याने अनेकांना वेड लावलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT