
गुजरातमध्ये १६ मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नव्या २५ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली.
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह अनेक नेत्यांचा शपथविधी झाला.
Gujarat Cabinet Reshuffle News : गुजरातच्या राजकारणाच्या एका नव्या अध्यायाला सुरूवात झाली आहे. काल (१६ ऑक्टोबर) गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी सामूहिक पद्धतीने राजीनामे दिले होते. आज (१७ ऑक्टोबर) नव्या मंत्र्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीमध्ये मंत्र्यांच्या शपथविधी पूर्ण झाला. हर्ष संघवी यांनी सर्वप्रथम मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे गुजरातचे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्याची शक्यता आहे. एकूण २५ मंत्र्यांनी शपथ घेतली, यात १६ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
सर्वप्रथम शपथ घेणाऱ्या हर्ष संघवी यांना गुजरातचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
जितेंद्रभाई वाघानी यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. ते भावनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
अर्जुन मोढवाडिया हे गुजरात भाजपचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
कोडिनार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार डॉ. प्रद्युम्न वाजा यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
नरेश पटेल यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. ते विसनगरचे आमदार आहेत.
क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनीही राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
बोरसडचे आमदार रमणभाई सोलंकी यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
नवसारी मतदारसंघाचे आमदार दर्शना वाघेला यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
स्वरूपजी ठाकोर हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
पटेल समुदायाचे भाजप नेते ईश्वरसिंग पटेल यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली.
राज्यमंत्रीपदाची शपथ घेणारे प्रफुल्ल पानसेरिया हे कामरेज मतदारसंघाचे आमदार आहेत.
डॉ. मनीषा वकील यांची पुन्हा मंत्रिमंडळात निवड झाली आहे. वडोदराच्या आमदार आहेत.
गुजरात भाजपचे एक प्रमुख नेते मानले जाणारे त्रिकम छंगा यांची पुन्हा मंत्रिमंडळात निवड झाली आहे.
२००७ पासून हृषिकेश पटेल विसनगरचे आमदार आहेत, त्यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
पुनमचंद बरंडा हे भाजपचे आदिवासी नेते आहेत. त्यांनी २०२२ मध्ये भिलोरा येथून निवडणूक जिंकली.
कांतीलाल अमृतिया हे मोरबी येथून पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनाही मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे.
कुंवरजीभाई बावलिया हे कोळी समाजाचे नेते आहेत जे २०१८ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झाले होते.
भावनगर ग्रामीणचे आमदार परशोत्तम सोलंकी यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
१९. भाजपचे नेते कमलेशभाई पटेल यांनाही मंत्रीमंडळात जागा मिळाली आहे. ते १९९८ पासून राजकारणात सक्रीय आहेत.
गुजरातमधील महुधा मतदारसंघातील आमदार संजयसिंह महिदा यांना मंत्रीपदी नियुक्त करण्यात आले आहे.
आदिवासी भागातील नेते रमेश कटारा यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते भाजपचे नवे मंत्री आहेत.
माजी अर्थमंत्री कनुभाई देसाई यांची पुन्हा मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते पारधी मतदारसंघाचे आमदार आहेत.
गुजरातच्या माळी समुदायाचे नेते प्रवीण कुमार माळी यांनाही मंत्रिमंडळात सामील करण्यात आले आहे.
कौशिक वेकारिया २०२२ मध्ये अमरेलीतून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या. काही अनुभवी नेत्यांना सोबत घेताना नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.