
वंदे भारत स्लीपर गाड्या नव्याने डिझाइन केल्या आहेत.
वरच्या बर्थसाठी शिडी सुधारण्यात आली आहे.
१,९२० स्लीपर कोच तयार होणार आहेत.
Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होईल असे म्हटले जात आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा या हिशोबाने तयार करण्यात आली आहे. प्रवासी वंदे भारत स्लीपर लाँच होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सार्वजनिक वाहतूक कंपनीने नवीन आलिशान इंटीरियरचा नमुना दाखवला आहे, जो आधुनिक वंदे भारत स्लीपरची जागा घेईल.
नव्याने लाँच होणाऱ्या वंदे भारत स्लीपर गाड्या सर्व वयोगटातील प्रवाशांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी आणि सोपा करण्यासाठी वरच्या बर्थसह नव्याने डिझाइन केल्या जात आहेत. किनेट येथील वंदे भारत प्रकल्पाचे संचालक निशंक गर्ग यांनी यासंदर्भात माहिती दिली. प्रवाशांचा फिडबॉक घेऊन ट्रेनच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
'बऱ्याच प्रवाशांना वरचा बर्थ अस्वस्थ वाटतो, अनेकांना तेथे पोहोचणे देखील कठीण होते. नवीन वंदे भारत स्लीपर तयार करताना आम्ही हा फिडबॅक लक्षात ठेवला होता', असे निशंक गर्ग म्हणाले. 'वरच्या बर्थसाठी शिडीची डिझाइन बदलण्यात आली आहे. हे बदल पहिल्या ट्रेनमध्ये असतील, ही ट्रेन पुढच्या वर्षी सुरु करण्याची योजना आखली जात आहे. याचे काम लवकरच पूर्ण होईल', असेही गर्ग यांनी म्हटले.
नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील नवी डिझाइन भारतीय रेल्वे प्रवासात आरामाची नव्याने व्याख्या तयार करेल. प्रवाशांना उच्च स्तराच्या प्रवासाचा अनुभव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वंदे भारत भारतासाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्याच्या भविष्यासाठी हा आमचा दृष्टिकोन आहे, असे वक्तव्य किनेट येथील मुख्य डिझायनर एव्हगेनी मास्लोव्ह यांनी केले.
किनेट रेल्वे सोल्युशन्स ही रशियाची ट्रान्समॅशहोल्डिंग कंपनी देशातील मोठी रोलिंग स्टॉक उत्पादक कंपनी आणि भारतातील रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) यांच्यातील भागीदारीत वंदे भारत प्रकल्पासाठी १,९२० स्लीपर कोच (१२० ट्रेनसेट) डिझाइन आणि उत्पादन करण्यासाठी करारबद्ध करण्यात आला आहे. या संयुक्त उपक्रमाद्वारे पुढील ३५ वर्षांसाठी डब्यांची देखभाल देखील केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने रेल्वे आधुनिकीकरणात मोठी प्रगती केली आहे. मागच्या ११ वर्षांमध्ये ३५,००० किलोमीटर नवीन ट्रॅक लावले गेले, ४६,००० किलोमीटर रेल्वे विद्युतीकरण केले गेले आणि ४०,००० नवीन डबे तयार केले गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.