Nasa : 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती, नासा चंद्रावर उभारणार अणुभट्टी

Nasa Moon Mission : अमेरिकन अंतराळ संस्था नासा चंद्रावर अणुभट्टी उभारणार आहे. चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती करता यावी यासाठी नासानं हे मिशन हाती घेतलंय. कशी आहे नासाची ही नवी मोहीम, पाहूयात हा रिपोर्ट
Nasa Moon
Nasa Moon x
Published On

अमेरिकेनं अंतराळ संस्था ‘नासा’ वेगवेगळ्या अवकाश मोहिमा राबवत असते. मिशन मून ही त्यांची महत्वाकांक्षी मोहीम आहे. याच मोहिमेअंतर्गत नासां चंद्रावर अणुभट्टी उभारण्याची घोषणा केलीय. त्यानुसार कामही सुरू केलंय. या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती शक्य करणे हे आहे. ही योजना यशस्वी झाल्यास भविष्यात चंद्रावरील मानवी वस्त्या आणि वैज्ञानिक संशोधनासाठी अमर्याद ऊर्जेचा स्रोत प्राप्त होईल..‘नासा’चे कार्यकारी प्रमुख सीन डफी यांनी या योजनेची घोषणा केलीय. ही योजना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा महत्वपूर्ण भाग मानली जातीय.. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार...

नासा चंद्रावर उभारणार अणुभट्टी

नासामार्फत चंद्रावर अणुभट्टी उभारली जाणारंय. हा प्रकल्प आर्टेमिस मिशनचा एक भाग असून, त्याचा अंदाजित खर्च 8,200 अब्ज रुपये आहे. या प्रकल्पासाठी लवकरच खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले जाणार आहेत. नासाने 2022 मध्येच तीन खासगी कंपन्यांना प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख डॉलर दिले होते.100 किलोवॉट क्षमतेची एक अणुभट्टी विकसित करणं हे नासाचं लक्ष्य आहे. या अणुभट्टीमुळे चंद्रावर उर्जेचा स्त्रोत तयार होईल. त्यामुळे 2030 पर्यंत चंद्रावर कायमवस्वरूपी मानवी वस्ती शक्य होईल.

Nasa Moon
Viksit Bharat Rozgar Yojana : साडेतीन कोटी तरूणांना 15 हजार मिळणार, स्वातंत्र्यदिनी मोदींचं गिफ्ट; कोण ठरणार पात्र?

ही अणुभट्टी चंद्रावरील भविष्यातील अर्थव्यवस्थेला गती देईल आणि अमेरिकेच्या अवकाश सुरक्षेला मजबूत करण्यास मदत करेल. चंद्रावर अणुभट्टी उभारण्यामागे आणखीही एक कारण आहे, ते म्हणजे... रशिया किंवा चीनसारख्या इतर अवकाश महासत्तांनी चंद्रावर आधी अणुभट्टी उभारली, तर चंद्रावर ते आपला हक्क सांगू शकतात, ज्यामुळे अमेरिकेसमोरील आव्हानं वाढतील. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केलंय. अर्थात यामागे अमेरिकेचा स्वार्थ असला तरी या प्रकल्पामुळे मानवाच्या अवकाश प्रवासाला एक नवी दिशा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

Nasa Moon
Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com