
सोलापूरमधील वरिष्ठ सहकार नेते बबनराव आवताडे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि जयवंत जगताप यांनी त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आवताडे शिंदे गटात आल्यास सोलापूरच्या सहकार क्षेत्रात शिंदे गटाचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. सोलापूरमध्ये अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दोन माजी आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर मंगळवेढ्यातील नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे काका आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे हे सहकार क्षेत्रातील वरिष्ठ नेते आहेत. शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगळवेढ्याला येत बबनराव आवताडे यांची भेट घेतली. तेव्हापासून आवताडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी करमाळा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जयवंत जगताप हे बबनराव आवताडे यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आवताडे यांच्या प्रवेशासाठी शहाजीबापू पाटील आणि जयवंत जगताप यांनीही आग्रह केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मंगेश चिवटे हेदेखील आवताडे यांच्या प्रवेशासाठी आग्रही आहेत.
बबनराव आवताडे यांनी सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील सहकारी संस्थांवर वर्चस्व राखले आहेत. त्यांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, तर सोलापूरमध्ये सहकार क्षेत्रातील मोठा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला मिळेल. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचा मोठ्या प्रमाणात सहकारी संस्थांमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.