Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Jalna News : जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यक्तीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला ताब्यात घेताना पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या कमरेत लाथ घातली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jalna News
Jalna Newssaam tv
Published On
Summary
  • स्वातंत्र्यदिनी एका व्यक्तीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

  • पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्यामुळे वैफल्यग्रस्त व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

  • या व्यक्तीला ताब्यात घेताना एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या कमरेत लाथ घातली.

Viral Video : जालना येथून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्याच्या कमरेत लाथ घातली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनीही त्यांची बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील एका व्यक्तीच्या पत्नीने परस्पर दुसरे लग्न केले. या व्यक्तीने यासंदर्भात पोलिसांशी संपर्क साधला. पण पोलिसांकडून मदत झाली नसल्याचा आरोप व्यक्तीने केला. पत्नीने परस्पर लग्न केल्याच्या वैफल्यातून आणि पोलिसांकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्याने स्वातंत्र्यदिनी अंगावर राॅकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Jalna News
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगेंना चक्कर आली, बैठकीनंतर प्रकृती खालावली

पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्याने वैफल्यग्रस्त व्यक्तीने अंगावर रॉकेल घेऊन आत्महदनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीला कमरेत पोलीस अधिकाऱ्याकडून लाथ मारतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अगोदर घडलेल्या या प्रकऱणानंतर पोलिसांनी गोपाळ चौधरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

Jalna News
Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

लाथ मारतानाच्या व्हिडीओवर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आत्महदन करण्यासाठी हा व्यक्ती स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकत होता. तेव्हा त्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगवारही राॅकेल टाकण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये बळाचा वापर केल्याचे स्पष्टीकरण उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिले आहे.

Jalna News
Shocking : २ वर्षांपूर्वी भरती; भाईंदरमध्ये नेमणूक, अवघ्या २४ वर्षांच्या पोलिसानं मृत्यूला कवटाळलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com