Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगेंना चक्कर आली, बैठकीनंतर प्रकृती खालावली

Manoj Jarange Patil Health Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेड दौऱ्यादरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
manoj jarange patil.
manoj jarange patilsaam tv
Published On
Summary
  • मुंबईच्या मराठा मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील यांची तयारी सुरु आहे.

  • या तयारीच्या निमित्ताने ते नांदेडला गेले होते.

  • नांदेड दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली.

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nanded : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. २९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईत दाखल होण्याचे आवाहन केले आहे. हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर काहीही झाले तरीही आम्ही मागे हटणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मोर्चाची तयारी सुरु असताना अचानक मनोज जरांगे पाटलांचा प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील सध्या नांदेड दौऱ्यावर आहे. २९ ऑगस्टसाठीच्या मराठा आंदोलन मोर्चासाठी त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान नांदेडमध्ये मनोज जरांग पाटील यांना चक्कर आली. सकाळपासून नांदेडमध्ये मराठा समाजाची जरांगे पाटील यांनी बैठक घेतली होती. चक्कर आल्यानंतर त्यांना नांदेडच्या विश्रामगृहात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्यांची तपासणी करत आहे.

manoj jarange patil.
Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या बैठकीत चोरट्यांचा धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. नांदेड जिल्ह्याभरातून आलेल्या मराठा बांधवांचे चोरट्यांनी पाकीट पळवले. चोरी करताना एक चोरटा मराठा बांधवांच्या हाती लागला. चोराला जमावाने चोप देत वेळीच चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अनेकांच्या खिशातील पाकीट आणि पैसे चोरल्याच्या तक्रारी आल्याचे म्हटले जात आहे.

manoj jarange patil.
Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM ला धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

२९ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यांनी सकल मराठा समाजाला मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन गणेशात्सवाच्या वेळी जरांगे पाटील मुंबईत आल्याने कायदा-सुव्यस्थेवर ताण येईल असे म्हटले जात आहे. यासाठी प्रशासनाकडून नियोजन करायला सुरुवात झाली आहे.

manoj jarange patil.
Accident : खासदाराच्या कार्यालयासमोर भयंकर अपघात! आधी उडवलं, नंतर फरफटत नेलं; अपघाताचा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com