YouTube डाऊन! व्हिडीओ पाहण्यात अडथळे, जगभरातील यूजर्स वैतागले; नेमकं काय घडलं?

YouTube Down : आज (१६ ऑक्टोबर) सकाळी पाचच्या सुमारास अचानक यूट्यूब सेवा बंद पडल्या. यामुळे यूजर्संना त्रास सहन करावा लागला. त्यानंतर सोशल मीडियावर यूट्यूब डाऊन ड्रेंड होऊ लागला.
Youtube Down
Youtube Downx
Published On
Summary
  • यूट्यूब अचानक बंद पडल्याने जगभरातील यूजर्स त्रस्त

  • लाखो लोकांच्या व्हिडीओ न चालणे, अ‍ॅप न उघडणे अशा तक्रारी

  • तांत्रिक बिघाड दूर करण्याचे यूट्यूबचे आश्वासन

सोशल मीडियावर मागील काही तासांपासून #YouTubeDown ट्रेंड सुरु आहे. आज (१६ ऑक्टोबर) सकाळी ५.२३ वाजता अचानक यूट्यूब सेवा बंद पडल्या. यामुळे अन्य सोशल मीडिया साईट्सवर यूट्यूब डाऊन ट्रेंड होऊ लागला. तांत्रिक अडचणींचा मागोवा घेणारी वेबसाईट DownDetector नुसार, तोपर्यंत ३.४ लाखांहून अधिक यूजर्सनी यूट्यूब सेवा बंद पडल्याची तक्रार केली हेती.

डाऊनडिक्टेटरच्या अहवालानुसार, ५६ टक्के यूजर्संनी व्हिडीओ स्ट्रीमिंगमध्ये अडथळा निर्माण झाल्याची तक्रार दाखल केली होती. ३२ टक्के यूजर्संनी मोबाईलमध्ये यूट्यूब अ‍ॅप सुरु होत नसल्याचे म्हटले आणि १२ टक्के यूजर्संना वेबसाईट अ‍ॅक्सेस देखील करता येत नव्हते. अनेकांनी व्हिडीओ लोड होत नसल्याचे सांगितले. काहींना सतत लॉगआउट झाल्याचे मेसेज मिळत होते.

Youtube Down
Accident : भीषण! ट्रकखाली चिरडून तरुण इंजिनिअरचा जागीच मृत्यू, घटनेचा CCTV व्हायरल

यूट्यूब डाऊनचा सगळ्यात जास्त परिणाम अमेरिकेवर झाला. एटल, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस, फिनिक्स, शिकागो, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन आणि डेट्रॉईट सारख्या प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक तक्रारी आल्या. ही सामान्य समस्या नव्हती, तर मोठा तांत्रिक बिघाड होता. अमेरिकेसह भारत आणि यूकेमध्येही एकाच वेळी यूट्यूब सेवा विस्कळीत झाल्या होत्या. लोक व्हिडीओ प्ले करु शकत नव्हते. अ‍ॅप उघडताना अनेकांना अडचणी येत होत्या, त्याशिवाय वेबसाईट लॉन अन देखील करता येत नव्हते.

Youtube Down
Politics : युतीत फूट, भाजपला मोठा धक्का; NDA तील मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

यूट्यूब सेवा बंद होताच सोशल मीडियावर #YouTubeDown ट्रेंड होऊ लागला. यूजर्स सेवा बंद झाल्याने स्क्रीनशॉट शेअर करत नाराजी व्यक्त करत होते. अनेक कंटेंट क्रिएटर्स, यूट्यूबर्स यांनी व्हिडीओ अपलोड, शेड्यूल करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. सकाळी ५ वाजल्यापासून तक्रारी वेगाने वाढू लागल्या होत्या. काही मिनिटांमध्ये ३.४ लाखांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. यूट्यूब कंपनीने अद्याप आउटेज का झाला यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. तांत्रिक बिघाडावर आम्ही काम करत आहोत, असे यूट्यूब कंपनीने एक्स पोस्टद्वारे सांगितते.

Youtube Down
Viral : घरकाम करणाऱ्या बाईला ४५,००० हजार पगार, मालकिणीने बनवला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com