Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?

Gold Rate News : सोन्याच्या दरामध्ये लक्षणीय प्रमाणात घट होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. एएनझेडच्या अहवालानुसार, राजकीय अस्थिरता, भू-राजकीय तणाव यांचा परिणाम किमतीवर होईल.
Gold Rate
Gold Rate x
Published On
Summary
  • २०२५ मध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले.

  • २०२६ मध्ये सुरुवातीला वाढ, नंतर घट अपेक्षित.

  • बाजार आता पुढील किमतींबाबत उत्सुक आहे.

Gold Price : सोन्याच्या किमतीत २०२५ मद्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सोन्याचे दर हे अंदाजे ६१ टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे स्टॉक, बाँड आणि इतर गुंतवणूक साधनांच्या तुलनेत गुंतवणूकदारांसाठी सोन्याची विक्री किंवा गुंतवणूक हा सर्वाधिक उत्पन्न देणारा पर्याय बनला आहे. आता पुढे सोन्याच्या किमतीत वाढ होणार की त्याचे दर कमी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एएनझेड बँकेच्या मते, पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय प्रमाणात घट होऊ शकते. २०२५ मध्ये सोन्याच्या दरात विविध कारणांमुळे विक्रमी वाढ झाली होती. भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता, अमेरिकेतील व्याजदरांमध्ये संभाव्य कपात, डॉलरच्या किंमतीवरील परिणाम या गोष्टींमुळे सोन्याचे दर वाढल्याचे म्हटले जात आहे. स्पॉट गोल्डने प्रति औंस $४,२२५.६९ या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहोचले आणि नंतर ०.४ टक्क्यांनी वाढून ४,२२४.७९ डॉलरवर पोहोचले.

Gold Rate
YouTube डाऊन! व्हिडीओ पाहण्यात अडथळे, जगभरातील यूजर्स वैतागले; नेमकं काय घडलं?

अनिश्चितता, जागतिक संकट अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर जागतिक बाजारपेठेवर परिणाम होतो, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढवतात. रॉयटर्सने दिलेल्या ANZ अहवालानुसार, २०२५ वर्षाच्या अखेरीस सोन्याचे भाव प्रति ति औंस ४,४०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात . त्यानंतर जून २०२६ पर्यंत सुमारे ४,६०० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. पुढच्या वर्षात जुलै २०२६ ते डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याच्या दरात लक्षणीय घट अपेक्षित आहे.

Gold Rate
Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

ANZ अहवालानुसार, राजकीय अस्थिरता, भू-राजकीय तणाव यांसारखे घटक गुंतवणूकदारांना सोन्याकडे आकर्षित करत राहतील. २०२६ च्या मध्यापर्यंत चांदीचे भाव प्रति औंस ५७.५० डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतात. पण जर यूएस फेडरल रिझर्व्ह बँकेने पवित्रा कडक केला किंवा अमेरिकन अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली, तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोन्याच्या किमती घसरू शकतात.

Gold Rate
Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com