Weather Update : दिवाळीत धो-धो कोसळणार? परतीचा पाऊस त्रास देणार; वाचा Report

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी हवामान विभागानुसार दिवाळीतही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Weather Update
Weather Updatex
Published On
Summary
  • महाराष्ट्रात परतीचा पाऊस अजूनही कायम असून दिवाळीतही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • हवामान विभागानुसार १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता राहणार आहे.

  • मान्सून राज्यातून माघारी फिरत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

Weather Update : दिवाळीच्या सणाला लवकरच सुरुवात होत आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना राज्यात अजूनही परतीचा पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. हवामान विभागानुसार, राज्यातील काही भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होईल. पण काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम प्रमाणात सरी बरसतील, असे म्हटले जात आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. असे असले तराही पुढच्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागांत पावसाचा जोर ओसरेल. पण काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

Weather Update
Politics : युतीत फूट, भाजपला मोठा धक्का; NDA तील मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

सध्या मान्सून राज्यातील बहुतेक भागातून माघारी फिरला आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पाऊस सक्रीय आहे. पुढच्या दोन ते दीन दिवसात तेथूनही पाऊस परतेल. तरीही दिवाळीच्या काळात, म्हणजेच १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही १६ आणि १७ ऑक्टोबर या दोन दिवसात पाऊस पडू शकतो.

Weather Update
Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

हवामान विभागानुसार, मान्सून आता देशाच्या सुमारे ८५ टक्के भागातून परतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये देशातील उर्वरित भागातूनही मान्सून माघारी फिरणार आहे. यादरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सून साधारणपणे १५ ऑक्टोबरच्या सुमारास देशातून पूर्णपणे परतेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Update
Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com