Accident : हिट अँड रनचा थरार! भरधाव कारने बहिणींना चिरडले; थोरलीचा मृत्यू, धाकटी गंभीर जखमी

Chandigarh Car Accident: भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कॉलेजच्या परिसरात दोन बहिणींना चिरडले. अपघातामध्ये थोरल्या बहिणीचा मृत्यू झाला, तर धाकटी बहीण गंभीररित्या जखमी झाली.
Hit And Run Accident
Hit And Run Accidentx
Published On
Summary
  • हिट अँड रनचा थरार

  • कारने बहिणींना चिरडले

  • थोरल्या बहिणीचा मृत्यू

  • धाकटी बहीण गंभीर जमखी

Hit And Run : एका कॉलेजजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन बहिणींना चिरडले. या दुर्घटनेमध्ये थोरल्या बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धाकटी बहीण गंभीररित्या जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारमालक आणि कारचा शोध घ्यायला सुरुवात केली. कारमालक कार सोडून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही अपघाताची घटना चंदीगडमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (१५ ऑक्टोबर) दुपारी २ च्या सुमारास वेगाने येणाऱ्या कारने कॉलेजमधून घरी परतत असणाऱ्या बहिणींना धडक दिली. अपघातानंतर मुलींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांनी कार प्लेटच्या मदतीने मालकाची माहिती मिळवली. पण मालक त्यांना सापडला नाही. त्याने घर विकल्याचे वृत्त आहे. ज्या कारने त्याने दोन्ही मुलींना चिरडले, त्या कारवर डझनभराहून अधिक चलन प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Hit And Run Accident
Cricketer Death : प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचे निधन, पुण्यात घेतला शेवटचा श्वास; क्रिकेटजगतात हळहळ

अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही बहिणी या चंदीगड सेक्टर ४५ च्या बुडैल येथे त्यांच्या कुटुंबासह राहत होत्या. त्यांचे कुटुंब मूळचे उत्तरप्रदेशचे आहे. अपघातात मृत्यू झालेल्या थोरल्या बहिणीचे नाव सोजेफ (वय २२ वर्षे) आणि जखमी झालेल्या धाकट्या बहिणीचे नाव ईशा असे आहे. कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी दोघी रिक्षाची वाट पाहत होत्या. तेव्हा ही दुर्घटना घडली.

Hit And Run Accident
Court : कोर्टात सरकारी वकिलाला मारहाण! थेट चेंबरमध्ये घुसून बेदम मारलं, बूट फेकून मारला

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. तेवढ्यात एक कार भरवेगाने आली. त्यात दोन मुलं आणि एक मुलगी बसली होती. कारचा वेग खूपच जास्त होता. कारने दोन्ही मुलींना धडक मारली, धडकेनंतर त्या दोघी फेकल्या गेल्या. अपघाताच्या ठिकाणी ऑटो-रिक्षा अनेकदा रस्त्यावर उभ्या असतात आणि रस्ता ओलांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रिल तुटलेल्या असतात. यामुळे लोक क्रॉस करतात आणि वाहतूक इतकी जास्त असते की आधीही अनेक अपघात घडले आहेत.

Hit And Run Accident
Maharashtra Politics : पुण्यात शरद पवारांना दुहेरी धक्का, दोन दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com