
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून यादी जाहीर
भाजपमध्ये तिकीट वाटपावरून मोठा वाद.
अजय झा यांना तिकीट नाकारल्याने ते ढसाढसा रडले
अजय झा यांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अजय झा यांना तिकीट नाकारण्यात आले त्यामुळे ते ढसाढसा रडले. ऐवढंच नाही तर अजय झा यांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला. कुटुंबातील सदस्यांनी आि समर्थकांनी वेळीच रोखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अजय झा यांना नरपतगंज विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आले.
अजय झा यांनी माध्यमांशी बोलताना तिकीट न मिळाल्याचा राग व्यक्त केला. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला असे ते म्हणाले. झा यांनी सांगितले की, त्यांनी १९८५ मध्ये युवा काँग्रेसपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु गेल्या २५ वर्षांपासून ते भाजपसोबत आहेत आणि पक्षासाठी मनापासून काम करत आहेत.
त्यांनी दावा केला की, लोकसभा निवडणुकीदरम्यान, अनेक वरिष्ठ भाजप नेते - मंत्री मंगल पांडे, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल - यांनी त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळेल असे आश्वासन दिले होते. पण जशी निवडणुका जवळ येत गेली तसं विश्वासाऐवजी माझा विश्वासघात झाला. मला सांगितले होते की जोकीहाटमधून तिकीट मिळेल. पण तिथेही उमेदवार बदलण्यात आला. पक्षाने जातीय समीकरणांच्या नावाखाली कठोर परिश्रम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले.
त्यांच्या पत्नी संजू झा यांनीही पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, माझ्या नवऱ्याने भाजपसाठी दिवसरात्र काम केले. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. जर नरपतगंज यादवांची जागा असेल आणि फोर्ब्सगंज ही बनियाची जागा असेल, तर पक्षाने कोणती जागा कोणत्या जातीची आहे हे दर्शविणारे फलक लावावेत. संजू झा यांनी भाजपच्या "सबका साथ, सबका विकास" या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर तिकिटे जातीच्या आधारे वाटली जात असतील तर या घोषणा पोकळ ठरतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.