Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी भाजपकडून ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ९ महिलांना संधी

Bihar Politics: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. ७१ उमेदवारांची ही यादी असून त्यामध्ये ९ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

Summary -

  • भाजपने बिहार निवडणुकीसाठी ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली

  • यादीमध्ये ९ महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे

  • उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूरमधून निवडणूक लढणार

  • काही वरिष्ठ नेत्यांना तिकीट नाकारल्याने नाराजीचे सूर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ७१ उमेदवाराची पहिली यादी भाजपने आज जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये ९ महिला उमेदवारांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. विजय कुमार सिन्हा लखीसराय मतदारसंघातून निवडणूक लढवतील. राज्यमंत्री नितीन नबीन हे बांकीपूर मतदारसंघातून आणि रेणू देवी या बेतिया येथून निवडणूक लढवतील.

भाजपने आरामधून संजय सिंह आणि गायत्री देवी परिहारमधून निवडणूक लढवतील. भाजपने जमुई येथून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी दिली. प्रमोद कुमार हे रक्सौल येथून निवडणूक लढवतील. सुनील कुमार पिंटू यांना सीतामढी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. रीगामधून वैद्यनाथ, मधुबनमधून राणा रणधीर, बाथनाहमधून अनिल कुमार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेनिपट्टीतून विनोद नारायण झा आणि अरवालमधून मनोज शर्मा निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा
Bihar Election: मतदान प्रक्रियेत मोठा बदल; प्रत्येक बूथवर फक्त १२०० मतदार,मोबाईलच्या वापरास बंदी

भाजपने सात वेळा आमदार राहिलेले नंदकिशोर यादव यांना तिकीट दिले नाही. रत्नेश कुशवाह यांना पाटणा साहिबमधून तिकीट देण्यात आले आहे. मंत्री मोतीलाल प्रसाद यांचे रीगामधून तिकीट नाकारण्यात आले तर रामसुरत राय यांचे औराईमधून तिकीट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा
Bihar Election: बिहारच्या निवडणुकीत मराठी सिंघम मैदानात, कोण आहे मराठी पोलीस अधिकारी?

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये ९ महिलां उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये बेतियामधून रेणू देवी, परेहारमधून गायत्री देवी, नरपतगंजमधून देवंती यादव, किशनगंजमधून स्वीटी सिंह, प्राणपूरमधून निशा सिंगह, कोढा येथून कविता देवी, औराई येथून रमा निषाद, वारसलीगंज येथून अरुणा देवी आणि जमुई येथून श्रेयसी सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? वाचा
Bihar Election : NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप-जेडीयू किती जागांवर निवडणूक लढणार? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com