Period Leave:  Saam Tv
देश विदेश

Period Leave: नोकरदार महिलांसाठी गुड न्यूज, १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार

Period Leave For Working Women: नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिलांना वर्षाला १२ मासिक पाळीची रजा मिळणार आहे. कर्नाटक सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

Priya More

Summary -

  • कर्नाटक सरकारने नोकरदार महिलांसाठी घेतला मोठा निर्णय

  • महिलांसाठी १२ दिवसांची पगारी मासिक पाळी रजा मंजूर

  • सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना होणार फायदा

  • महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय

मासिक पाळीदरम्यान महिलांना प्रचंड वेदना होतात. या काळात महिलांना काम करणं देखील कठीण होते. याच गोष्टी लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने नोकरदार महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिलांना तब्बल १२ दिवसांची मासिक पाळीची रजा मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यातील सरकारी कार्यालये, बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी क्षेत्र आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या मंत्रिमंडळाने गुरूवारी राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या वेळी रजा देण्याची घोषणा केली. कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाचे सर्व महिलांकडून स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नोकरदार महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नोकरी करणाऱ्या महिलांचे आरोग्य, आराम आणि मानसिक संतुलन लक्षात घेऊनच हा निर्णय सरकारने घेतला आहे.

कर्नाटक राज्य हे देशातील त्या राज्यांच्या यादीत सहभागी झाले आहे ज्यांनी महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा आदेश जारी केला आहे. कर्नाटक सरकारने जाहीर केले की, आतापासून, राज्यातील सरकारी कार्यालये, वस्त्र उद्योग, बहुराष्ट्रीय कंपन्या, आयटी कंपन्या आणि इतर खासगी क्षेत्रातील संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना दरमहा एक दिवस मासिक पाळीच्या पगारी रजा मिळेल. म्हणजेच या महिला कर्मचाऱ्यांना वर्षाला १२ मासिक पाळी रजा मिळणार आहे.

कर्नाटक सरकारचा हा निर्णय घेण्यामागचा मुख्य उद्देश महिला कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक दिलासा देणे नाही तर मासिक पाळीच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. त्याचसोबत कामाच्या ठिकाणी या समस्येचे सामान्यीकरण आणि उपचार करण्याची संस्कृती वाढवणे आहे. सरकारला आशा आहे की, या धोरणाद्वारे खासगी कंपन्या देखील महिला कर्मचाऱ्यांबद्दल अधिक संवेदनशील आणि सहाय्यक दृष्टिकोन स्वीकारतील. त्यामुळे संस्थेमध्ये निरोगी आणि समान कामाचे वातावरण निर्माण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! आज वाहतुकीत मोठे बदल, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Maharashtra Live News Update : पुणेकरांवरील 5 टक्क्यांवरील करवाढ रद्द

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सरकारच्या हालचाली;₹१५००बाबत मोठी अपडेट समोर

Social Media Ban: अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

Shivneri Fort : शिवनेरीवर शिवजयंती उत्सवाला गालबोट; मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक शिवभक्त जखमी

SCROLL FOR NEXT