First Period: पहिल्या पिरीयड्स नंतरचा ‘तो’ टप्पा…! मुलीच्या विचारसरणीपासून जीवनशैलीपर्यंत होणारे मोठे बदल

First Period Teenage To Womanhood: प्रत्येक मुलीच्या आयुष्यात पहिली पाळी (Menarche) येणे हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. हे केवळ शारीरिक परिवर्तन नसून, मुलीच्या मानसिकतेत आणि जीवनशैलीत मोठे बदल घडवणारी घटना असते.
First Period
First Periodsaam tv
Published On

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला पहिला मासिक पाळीचा दिवस हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या क्षणी तिला जाणवतं की, ती आता फक्त लहान मुलगी राहिलेली नाही. हा क्षण केवळ शारीरिक बदलांचा नसून मानसिक आणि भावनिक वाढीचाही असतो. या काळात मुली स्वतःकडे अधिक जबाबदार नजरेने पाहू लागतात.

विचारसरणीत होणारे बदल

टीनएजपर्यंत मुली बहुधा बिनधास्त आणि निर्धास्तपणे त्यांचं आयुष्य जगत असतात. मात्र पहिल्यांदा पाळी सुरू झाल्यानंतर त्यांच्या मनात अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात. त्या आपल्या शरीराची स्वच्छता, आरोग्य आणि काळजी घेण्याकडे लक्ष देऊ लागतात. इतकंच नाही तर भावनांना समजून घेणं आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळणंही शिकायला लागतात. या प्रक्रियेमुळे त्यांची विचारसरणी अधिक व्यवहार्य, आत्मविश्वासपूर्ण बनतं.

First Period
Early symptoms: महिलांमध्ये वाढतेय न्यूरोलॉजिकल विकारांचे प्रमाण; ६०% महिलांना सतावताय मेंदूशी संबंधित समस्या

जीवनशैलीमध्ये होतात अनेक बदल

पहिल्या पाळीनंतर अनेक मुलींना त्यांच्या कपड्यांच्या स्टाईलमध्ये तसंच शैलीत बदल करतात. त्या आता कपडे निवडताना आरामदायकपणा आणि स्वच्छतेला अधिक महत्त्व देतात.

त्याचबरोबर स्किनकेअर, हलका व्यायाम आणि पौष्टिक आहार यासारख्या सवयी त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. या सवयींमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक नवीन परिपक्वता दिसू लागते.

First Period
Lifestyle diseases India: बदलती जीवनशैली ठरतेय आजारांचं मुख्य कारण; मधुमेह-लठ्ठपणावर आता नियंत्रणाची गरज

पहिली पाळी ही मुलीच्या Womanhood कडच्या वाटचालीचा पहिला टप्पा असतो. या काळात आई आणि मुलीमधील संवाद अधिक मोकळा होतो. मुलीला समजतं की, ती आता आपल्या आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. हा प्रवास कधी सोपा नसतो. मात्र योग्य मार्गदर्शन आणि भावनिक आधार मिळाल्यास तो खूप सशक्त आणि आत्मविश्वासपूर्ण होतो.

First Period
Uncontrolled diabetes symptoms: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा डायबेटीज नियंत्रणाबाहेर गेलाय; लक्षणं ओळखून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com