Early symptoms: महिलांमध्ये वाढतेय न्यूरोलॉजिकल विकारांचे प्रमाण; ६०% महिलांना सतावताय मेंदूशी संबंधित समस्या

Women's brain health: आधुनिक जीवनशैली, वाढता तणाव आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेशी (Nervous System) संबंधित आजारांचे प्रमाण चिंताजनकपणे वाढत असल्याचे अनेक अभ्यासांतून समोर आले आहे.
Women's brain health
Women's brain healthsaam tv
Published On

मायग्रेन, एपिलेप्सी, मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, पार्किन्सन आणि अल्झायमर यांसारख्या न्यूरोलॉजिकल विकारांचं प्रमाण महिलावर्गात झपाट्याने वाढत चालले आहे. हे विकार महिलांच्या दैनंदिन आयुष्याबरोबरच त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर आणि त्यांच्या एकूण आरोग्यावर परिणाम करतात.

वाशीतील न्यूईरा हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. सुनील कुट्टी सांगतात की, महिलांमध्ये आढळणाऱ्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये मायग्रेन, अपस्मार (एपिलेप्सी), मल्टिपल स्क्लेरोसिस, स्ट्रोक, पार्किन्सन, अल्झायमर आणि न्यूरोपॅथी सारख्या विकारांचा समावेश आहे. डोकेदुखी, चक्कर येणे, सुन्नपणा, स्मरणशक्ती कमकुवत होणे, थकवा किंवा दृष्टी कमी होणे अशी सुरुवातीची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास मज्जातंतूचे कायमचे नुकसान होते तसेच स्मरणशक्ती गमावणे, अपंगत्व किंवा जीवघेण्या स्ट्रोकचा सामना करावा लागु शकतो.

Women's brain health
Heart Disease: तोंडाची स्वच्छता ठेवत नसाल तर कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; नव्या अभ्यासातून गंभीर इशारा

डॉ. कुट्टी पुढे सांगतात की , तणाव किंवा हार्मोनल बदलांमुळे महिलांना न्युरोलॅाजिकल विकारांचा सामना करावा लागतो व बऱ्याचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने निदानास विलंब होतो. वारंवार होणारी डोकेदुखी, अचानक येणारा अशक्तपणा किंवा बोलताना अडखळणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. वेळीच उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.

Women's brain health
Cancer Symptoms: शरीरात होणाऱ्या 5 मोठ्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; विविध कॅन्सरची असू शकतात लक्षणं

सध्या ६० टक्के महिलांना मेंदूशी संबंधित समस्या भेडसावत आहेत. दरमहा २५ ते ७५ वयोगटातील ६ पैकी १० महिलांना न्यूरोलॉजिकल विकारांचा सामना करत असल्याचं दिसून येतं. १० पैकी ३ महिलांना मायग्रेन तर २ महिलांना अपस्मार आणि एका महिलेला स्ट्रोकचा धोका असल्याचं समोर आलं आहे.

Women's brain health
Gallbladder Cancer: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा पित्ताशयाचा कॅन्सर झालाय; 'या' कारणाने ५ पट धोका वाढतो

डॉ. कुट्टी यांनी सांगितलं की , प्रगत इमेजिंग तंत्र, मिनीमली इव्हेसिव्ह न्यूरोसर्जरी, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि डीप ब्रेन स्टिम्युलेशनसारख्या आधुनिक तंत्रांमुळे महिलांना त्यांच्या जीवनाची गुणवत्ता परत मिळवण्यास मदत होते. वेळीच तपासणी, औषधोपचार, जीवनशैलीतील बदल, योग्य निदान आणि नियमित फॉलो-अप या गोष्टी वेळेत केल्यास पुढे होणारा धोका टाळता येऊ शकतो.

Women's brain health
Heart Attack Warning Signs: शरीरात 'हे' 5 मोठे बदल अचानक दिसले तर समजा हार्ट अटॅक येणारे; दुर्लक्ष करूच नका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com