Heart Disease: तोंडाची स्वच्छता ठेवत नसाल तर कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; नव्या अभ्यासातून गंभीर इशारा

Oral Hygiene and Heart Disease: दात घासणे, फ्लॉसिंग करणे याकडे दुर्लक्ष केल्यास केवळ दात आणि हिरड्यांचे आजारच होत नाहीत, तर तुम्हाला गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका नवीन संशोधनानुसार, जर तुम्ही तोंडाची स्वच्छता नीट राखली नाही, तर तुम्हाला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Oral Hygiene and Heart Disease
Oral Hygiene and Heart Diseasesaam tv
Published On
Summary
  • तोंडाची स्वच्छता हृदयविकारापासून बचाव करते.

  • अस्वच्छ तोंडामुळे रक्तात जंतूंची वाढ होते.

  • जंतू रक्ताद्वारे हृदयापर्यंत पोहोचू शकतात.

तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल की, दात आणि हिरड्यांची नीट स्वच्छता न राखल्यास दातात कीड लागते किंवा पोकळी तयार होते. पण तुम्हाला माहितीये का, की तोंडाची अस्वच्छता थेट हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते? नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.

या संशोधनानुसार, जर आपण रोज योग्य पद्धतीने तोंडाची स्वच्छता केली नाही, तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे मुखाची स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे.

Oral Hygiene and Heart Disease
Leg Vein Blockage: पायाच्या ब्लॉक नसा उघडण्यासाठी सोपे ४ उपाय; वेदनेपासूनही मिळेल त्वरित आराम

संशोधनातून काय निष्पन्न झालं?

नव्या अभ्यासानुसार, ज्या व्यक्ती त्यांच्या तोंडाची स्वच्छता नीट ठेवत नाही नाहीत. म्हणजेच योग्यरित्या दात घासत नाहीत किंवा तोंड स्वच्छ ठेवत नाहीत त्यांच्या रक्तात जंतूंची संख्या वाढते. हे जंतू रक्तवाहिन्यांत साचून हळूहळू हृदयापर्यंत पोहोचतात.

Oral Hygiene and Heart Disease
Silent killer cholesterol: सावध व्हा...! कोणतीही लक्षणं न दिसताही शरीरात वाढू शकतं कोलेस्ट्रॉल; कसे उपाय कराल, तज्ज्ञांची माहिती

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मते, रक्तामध्ये जंतूंची संख्या वाढली की अनेक समस्या शकतात –

  • दात व हिरड्यांमध्ये सड किंवा संसर्ग होऊ शकतो.

  • या संसर्गामुळे इन्फ्लमेशन वाढते.

  • दीर्घकाळ या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.

Oral Hygiene and Heart Disease
Kidney deterioration symptoms: कोणत्याही लक्षणांशिवाय खराब होतेय तुमची किडनी; शरीरातील 'हे' ४ मोठे बदल वेळीच ओळखा

तोंडाची स्वच्छता आणि हृदयाचं आरोग्य यांचा संबंध कसा?

जंतुसंसर्ग – तोंडात वाढलेले घातक जंतू रक्तप्रवाहात मिसळतात.

प्लाक तयार होणं – हे जंतू रक्तवाहिन्यांत चिकट पदार्थ तयार करतात.

रक्तप्रवाहात अडथळा – प्लाक साचल्याने धमन्या हळूहळू अरुंद होतात.

हृदयविकाराचा झटका – धमन्यांमध्ये जास्त प्रमाणात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

Oral Hygiene and Heart Disease
Cyst In Uterus: गर्भाशयातील गाठ किती गंभीर असू शकते? महिलांनी कोणती काळजी घेतली पाहिजे?

हृदयविकारापासून बचावासाठी काय करावे?

  • दिवसातून किमान दोनदा नीट दात घासले पाहिजेत.

  • दातांच्या फटींमध्ये अडकलेले अन्नकण योग्य पद्धतीने साफ करावेत.

  • वर्षातून किमान दोनदा दंतवैद्याकडून तपासणी करून घ्यावी.

  • जंक फूड, जास्त गोड पदार्थ यांचं सेवन टाळावं.

Oral Hygiene and Heart Disease
Uterine Cyst: कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय गर्भाशयातील गाठीवर होणार उपचार; 'या' उपायांनी महिलांना मिळेल आराम
Q

तोंडाची स्वच्छता न केल्याने हृदयावर काय परिणाम होतो?

A

रक्तात जंतू वाढून हृदयविकाराचा धोका वाढतो.

Q

तोंडातील जंतू हृदयापर्यंत कसे पोहोचतात?

A

रक्तप्रवाहाद्वारे जंतू हृदयापर्यंत पोहोचतात.

Q

धमन्यांमध्ये प्लाक कसे तयार होते?

A

तोंडातील जंतू रक्तात मिसळून प्लाक तयार करतात.

Q

हृदयविकाराचा झटका का येऊ शकतो?

A

धमन्यांमध्ये प्लाकचा अडथळा निर्माण झाल्यास झटका येतो.

Q

तोंडाच्या आरोग्यासाठी किती वेळा दात घासावेत?

A

दिवसातून किमान दोनदा दात घासावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com